हसमुख धीरजलाल सांकलियासांकलिया, हसमुख धीरजलाल : (१० डिसेंबर१९०८–२८ जानेवारी १९८९). जागतिक कीर्तीचे भारतीय पुरातत्त्वज्ञव संशोधक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात धीरजलालआणि मोतीगौरी या दांपत्यापोटी मुंबई येथे झाला. त्यांचे बहुतेक शिक्षणमुंबईत झाले. विद्यार्थिदशेतच त्यांनी लो. टिळकांचा आर्क्टिक हो इनद वेदाजहा संशोधनात्मक ग्रंथ वाचला आणि ते संस्कृत व इतिहासाच्या 

अभ्यासाकडे आकृष्ट झाले. ते बी.ए. (१९३०) आणि एम्.ए. (१९३२)

मुंबई विद्यापीठातून प्रथमश्रेणीत उतीर्णझाले. मुंबई विद्यापीठाचे भगवानलालइंद्रजी पारितोषिक त्यांना एम्.ए. साठीलिहिलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफनालंदा’ या प्रबंधासाठी मिळाले(१९३३). त्यानंतर ते एल्एल्.बी.झाले (१९३४). मुंबई लोकसेवाआयोगाने त्यांना अधिव्याख्यात्याचीनोकरी नाकारली आणि पुरातत्त्वखात्याने त्यांना किरकोळ अंगकाठीमुळे अधीक्षक म्हणून नेण्यास नकारदिला. अखेर फादर हेरास ह्यांच्यासल्ल्यानुसार त्यांनी लंडन विद्यापीठात ‘आर्किऑलॉजी ऑफ गुजरात’हा प्रबंध सादर करून पीएच्.डी. मिळविली (१९३७). इंग्लंडमध्ये⇨सर मॉर्टिर व्हीलर यांच्या मेडन कॅसल या रोन स्थलाच्याउत्खननात त्यांनी भाग घेतला. तसेच त्यांना सुप्रसिद्घ बिटिश प्राध्यापकएफ्. जे. रिर्चड्स यांचे मार्गदर्शन लाभले. भारतात परतल्यानंतर त्यांनीमुंबईच्या मार्फतिया या गुजराती कुटुंबातील सरलादेवी या युवतीशीविवाह केला (१९३८). सरलादेवी त्यांच्या संशोधनकार्यात रस घेत वप्रसंगोपात्त त्यांना मदत करीत. सांकलियांना पुण्याच्या डेक्कन कॉलेजातप्राचीन भारतीय इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली (१९३९).१९७१ ते १९७३ या कालावधीत ते डेक्कन कॉलेजचे संचालक होते.या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर गुणश्री प्राध्यापक म्हणून ते अखेरपऱ्यंत संशोधनकार्यात मग्न होते. डेक्कन कॉलेज ही संस्था त्यांनी कार्यभूमी मानली आणि तिचे अक्षरशः गुरुकुलात रूपांतर करून तिला जागतिककीर्ती मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रागैतिहास, पुराभिलेख,पुरातत्त्वविद्या, शिल्प, मूर्तिशास्त्र, नाणकशास्त्र, धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र,संस्कृत वाङ्‌मय–विशेषतः रामायण, महाभारत आणि पुराणे–तसेचज्योतिषआणि अध्यात्म इ. विविध विषयांत त्यांना रस होता आणित्यांवर त्यांनी लेखन केले. पुण्याजवळ भोसरी येथे ऐतिहासिक दफनभूमीचाशोध लावून त्यांनी आपल्या साक्षेपी संशोधनकार्यास प्रारंभ केला आणिभारतीय प्रागैतिहासाचा पाया घातला. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश,आंध प्रदेश, काश्मीर वगैरे प्रदेशांतील सु. वीस प्रसिद्घ प्राचीन स्थळांच्याउत्खननांत त्यांनी व्यक्तिशः भाग घेतला आणि महाराष्ट्र, राजस्थान आणिमध्य प्रदेशातील तामयुगीन काल उत्खननाद्वारे उभा केला. लांघणज(गुजरात), आहाड (राजस्थान), नावडातोडी, त्रिपुरी (मध्य प्रदेश)येथील उत्खननांत त्यांनी शास्त्रशुद्घ पद्घती आणि आधुनिक प्रगत तंत्राचावापर करून अनेक अवशेषांचे विवेचक विश्लेषण केले. नेवासे, नासिक,जोर्वे व इनामगाव (महाराष्ट्र) ही त्यांची उत्खनने भारताच्या प्रागैतिहासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. त्यांचे सर्वेक्षण-संशोधनाचे अहवाल काटेकोर वतपशीलवार असून संशोधनात्मक निष्कर्ष सबळ पुराव्यांच्या आधारेमांडलेले असत. सांकलियांनी विपुल लेखन केले. त्यात इंग्रजी ग्रंथांचीसंख्या सु. तीस आहे. याशिवाय हिंदी, गुजराती व मराठी या भाषांतहीत्यांनी स्फुटलेख व पुस्तिका लिहिल्या. विविध चर्चासत्रे व परिषदांतूनत्यांनी सु. दोनशेच्यावर शोधनिबंध वाचले. त्यांच्या ग्रंथांपैकी गोदावरी पॅलिओलिथिक इंडस्ट्री (१९५२), इंडियन आर्किऑलॉजी टूडे (१९६२),प्रीहिस्टरी अँड प्रोटोहिस्टरी इन इंडिया अँड पाकिस्तान (१९६३), स्टोनएज टूल्स (१९६४), इंट्रोडक्शन टू आर्किऑलॉजी (१९७१),आर्किऑलॉजी अँड रामायण (१९७६), डॉन ऑफ सिव्हिलिझेशन इनअन्डिव्हायडेड इंडिया (१९७८), बॉर्न फॉर आर्किऑलॉजी : ॲन ऑटोबायॉग्रफी (१९७८) इ. ग्रंथ महत्त्वाचे असून पुरातत्त्व परिचय(१९६६), महाराष्ट्र : अश्मयुग ते लोहयुग (१९७०), महाराष्ट्रातीलमानव (१९७०), वाल्मीकी रामायण (१९७३) या मराठीतील लहानपुस्तिकाही महत्त्वाच्या व उल्लेखनीय ठरल्या आहेत. त्यांच्या अहवालात्मकग्रंथांत आर्किऑलॉजी ऑफ गुजरात (१९४१), एक्स्कॅव्हेशन्स ॲटबह्मपुरी-कोल्हापूर (१९५२ सहलेखक–एम्. जी. दीक्षित ), रिपोर्टऑन द एक्स्कॅव्हेशन ॲट नासिक अँड जोर्वे (१९५५ सहलेखक– शां. भा. देव ), आर्किऑलॉजी ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, एक्स्कॅव्हेशन्सॲट महेशर अँड नावडातोली (१९५८) इ. महत्त्वाचे असून त्यांतूनप्रागैतिहासिक संस्कृतींवर प्रकाश पडतो. त्यामुळे नवीन सांस्कृतिक माहितीउजेडात आली. प्रीहिस्टरी अँड प्रोटोहिस्टरी इन इंडिया अँड पाकिस्तानहा त्यांच्या पुरातत्त्वीय संशोधनाचा सारभूत बृहद्ग्रंथ. या ग्रंथात त्यांनीआपल्या मौलिक चिकित्सक संशोधनाचे पुनर्विलोकन केले असूनअश्मयुगातील भिन्न कालखंडांचा अचूक आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे बॉर्न फॉर आर्किऑलॉजी … … या आत्मचरित्रात त्यांनी आपल्यासंशोधनात आलेल्या अनुभवांचा आणि आपण मांडलेल्या अनुमानांचाचिकित्सक दृष्टिकोनातून ऊहापोह केला आहे. 

त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानसन्मान-पुरस्कार लाभले. त्यांचाअनेक मान्यवर संस्थांशीही अध्यक्ष-सदस्य या नात्याने संबंध आला. त्यांपैकी रॉयल एशियाटिक सोसायटी ( मुंबई ), इंडो-पॅसिफिक प्रीहिस्टरीअसोसिएशन (कॅनबरा), हेरास इन्स्टिट्यट (मुंबई), इंडियन सोसायटीफॉर प्रीहिस्टॉरिक स्टडीज इ. प्रमुख असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांनाचकवर्ती रौप्यपदक (१९७२), रॉबर्ट बूस फुट–प्लाक (१९७४),कॅम्बेल स्मृति-सुवर्णपदक (१९८५) आणि पद्मभूषण (१९८५) हेपुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना जवाहरलाल नेहरू छात्रवृत्ती(१९६८) व त्यांच्या पुरातत्त्व परिचय या ग्रंथाला दहा हजाराचे पारितोषिकदिले (१९७१). 

अखेरपर्यंत ते कार्यमग्न होते. पुणे येथे त्यांचे वृद्घापकाळाने निधनझाले. त्यांच्या संशोधनाबद्दल वा काही अनुमानांबद्दल मतभिन्नताआढळते. रामायण-महाभारता संबंधीचे त्यांचे काही निष्कर्ष परंपरागतसंकल्पना-अनुमाने यांना छेद देतात तथापि त्यांची विद्वत्ता, साक्षेपीसंशोधन आणि इतिहासाकडे पाहण्याची प्रांजळ व निःपक्षपाती दृष्टीह्यागोष्टी वादातीत आहेत. 

संदर्भ : 1. Misra, V. N. Ed. Man and Environment, Vol. XIV, No. 2, Pune, 1989.

             २. रेगे, मे. पुं. संपा. नवभारत : ‘ऋषितुल्य संशोधक–डॉ. सांकलिया’, वाई, फेबुवारी, १९८९

देव, शां. भा.