सीनॉप्टेरिडेलीझ : अतिप्राचीन व प्रारंभिक काळात अस्तित्वात असलेला नेचांचा गण. पेलिऑप्टेरिडेलीझ, रेनॉल्टिफिलिकेलीझ किंवा प्रायमोफिलिसेस ही नावेही याच गणाला वापरली जातात. यामध्ये आ.सु.२५ प्रजाती व ६५ जाती समाविष्ट असून त्या सर्व विलुप्त झाल्या असल्याने त्यांचे फक्त जीवाश्म (विशेषतः खोडांचे व पानांचे) साधारणपणे डेव्होनियन ते पर्मियन ( मुख्यत्वे करून कार्‌बॉनिफेरस सु. ३२ ते १८·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात आढळतात. त्यांचा उगम तत्पूर्वी असलेल्या ⇨सायलोफायटेलीझ या प्रारंभिक वाहिनीवंत वनस्पतींच्या गणातील पूर्वजांपासून झाला असावा. सीनॉप्टेरिडेलीझमधील जाती आकाराने लहान असून त्यांचे खोड भूमिस्थित, द्विशाखाक्रमी व मूलक्षोड होते आणि त्यापासून भूमीवर सरल वायवी शाखा वाढलेल्या असत. काही जातींत यावर फार मर्यादित शाखा असून त्यांचा विस्तार एकाच पातळीत असल्याने त्या जाती नेचाप्रमाणे दिसत, तर काहींना अनेक शाखांमुळे क्षुपाचे स्वरुप आले होते. अनेक जातींत पानांचा संपूर्ण अभाव होता, तर आ. २. ॲनॅकोरोप्टेरिस : (अ) दलक, (आ) बीजुककोश.काहींत त्यांचा पूर्ण विकास झाला नव्हता त्यांचे कार्य बहुतांशी शाखाग्रे करीत असावीत. काही अपवाद ( उदा., स्टौरॉप्टेरिस आर्किऑप्टेरिस ) वगळल्यास बहुतेक सर्वांचे बीजुककोश प्रारंभिक प्रकारचे ( यूस्पोरँजिएट ) व समबीजुक होते. मात्र स्टौरॉप्टेरिस व आर्किऑप्टेरिस यांचे बीजुककोश आधुनिक प्रकारचे (लेप्टोस्पोरँजिएट ) व विषमबीजुक असावे. बीजुककोश मोठे आणि शाखाग्रांवर किंवा पानांसारख्या शाखांच्या किनारीवर असलेले आढळतात. ते काहींत एकेकटे, तर काहींत त्यांचे लहान झुबके परंतु बहुतेकांत अनेकांची संधानी असे [⟶ मॅरॅटिएलीझ ]. त्यांचे आवरण कोशिकांच्या अनेक थरांचे असून काही जातींत अपूर्ण विकसित असून स्फुटनास उपयुक्त अशा वलयामुळे पडलेल्या अग्रस्थ छिद्रांतून किंवा उभ्या चिरीतून असंख्य बीजुकांचे विकिरण घडून येत होते. हे वलय आ. ३ बॉट्रिऑप्टेरिस : बीजककोशबीजुककोशाच्या एका किंवा दोन्ही बाजूंवर बनलेले व त्यांची रुंदी दोन ते अधिक कोशिकांइतकी असे. जीवनचक्रातील गंतुकधारी, गंतुके, फलन, गर्भविकास इत्यादींबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. खोड व शाखा यांच्या अंतर्रचनेत या जातींत एकंदरित आद्यरंभाचे काही प्रकार आढळतात [⟶ रंभ ]. पर्णलेश मोठे व साधे होते. इटॅप्टेरिस, आ. ४. इटॅप्टेरिस : बीजुककोश.स्टौरॉप्टेरिस, झायगॉप्टेरिस, बॉट्रिऑप्टेरिस, ॲनॅकोरोप्टेरिस, गायरॉप्टेरिस इ. नावे या गणातील प्रजातींना दिली आहेत. पुराजीव महाकल्पातील ( सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) सर्व नेचांचा अंतर्भाव सीनॉप्टेरिडेलीझ, क्लॅडोझायलेलीझ व आ. ५. सीनृप्टेरिडेलीझ नेचामधील पर्माक्षाच्या प्रकाष्ठाचे विविध प्रकार (त्रिमितीय कृत्या) : (अ) टॅप्टेरिस, (आ) स्टौरॉप्टेरिस (इ) बॉट्रिऑप्टेरिस, (ई) ॲनॅकोरोप्टेरिसआर्किऑप्टेरिडेलीझ या तीन गणांत करून त्यांना प्रायमोफिलिसेस असे काहींनी म्हटले आहे अन्य काहींनी प्रायमोफिलिसेस व सीनॉप्टेरिडेलीझ हे एकच असे धरुन त्यांची विभागणी तीन कुलांत ( बॉट्रिऑप्टेरिडेसी, झायगॉप्टेरिडेसी व क्लॅडोझायलेसी) केली आहे.

पहा : नेचे पुरावनस्पतिविज्ञान.

परांडेकर, शं. आ.