सिरिली : (हिं. गोंज क. हंडेबळ्ळी लॅ. डेरिस स्कँडेन्स कुल-लेग्युमिनोजी उपकुल-पॅपिलिऑनेटी). सुमारे ३१ मी. पर्यंत उंच चढणारी ही मोठी वेल अंदमान, आग्नेय आशिया ते उत्तर ऑस्ट्रेलिया, म्यानमार, श्रीलंका व भारतात सर्वत्र आढळते. हिची इतर अनेक सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी (शिंबावंत) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. खोड व फांद्या जांभळट संयुक्त पाने मोठी व लांब, दले ९–१९ जोड्या फुले लहान व गुलाबी असून जून–ऑगस्टमध्ये येतात शिंबा (शेंग) लहान, चपटी, सरळ बिया १– ४ शिंबेवर एका बाजूस पंखासारखी अरुंद पट्टी असते. सालीपासून साधारण प्रतीचा धागा मिळतो. ही वेल शोभेकरिता लावतात.
परांडेकर, शं. आ.