सिंफनी : पाश्चात्त्य संगीतातील एक प्रमुख संगीतरचना-प्रकार.संपूर्ण वाद्यवृंदासाठी लिहिलेली ही दीर्घ, विस्तृत स्वरुपाची संगीतरचनाअसते आणि ती सामान्यतः तीन वा चार भागांत विभागलेली असते. याभागांना ‘मूव्हमेंट्स’ असे म्हणतात. बहुतेक सिंफनी चार मूव्हमेंट्सच्याअसतात पण काही सिंफनींमध्ये एकच, तर काहींमध्ये सहापर्यंतमूव्हमेंट्स असतात. बऱ्याचशा सिंफनींच्या रचनाबंधात पहिली मूव्हमेंटजलद वा द्रुत लयीची, दुसरी मूव्हमेंट संथ लयीची, तिसरीनृत्यात्मलयीचीआणि शेवटची चौथी मूव्हमेंट आल्हाददायी व जल्लोष प्रकट करणारीअसते. सिंफनीच्या आशय-विषयात कथन, नाट्यात्मक घटना, प्रसंग,विविध भावभावना यांना संगीतरचनांच्या विविध रुपांतून, शैलीतूनआविष्कृत केले जाते. सिंफनीच्या सुविहित रचनाबंधात भावाभिव्यक्तीव शैलीवैविध्य यांची अफाट क्षमता सामावलेली आहे. असंख्य, विविधभावभावना व्यक्त करणारा व शैलींची अनेकविध मिश्रणे व प्रयोग यांनावाव असलेला सिंफनी हा रचनाप्रकार आहे. हायडन, मोट्सार्ट, बेथोव्हन,ब्राम्झ, मालर प्रभृती पाश्चात्त्य संगीतकारांच्या सिंफनीरचनांमध्ये भावाभिव्यक्तीचे सामर्थ्य व शैलीवैविध्य यांचे प्रत्यंतर येते.
‘सिंफनी’ या शब्दाला पाश्चात्त्य संगीतात विविध अर्थच्छटा आहेत.स्वरमेळ हा एक अर्थ संगीताला दिलेली वाद्यांची साथसंगत (अकंपनीमेट)वाद्यवृंदासाठी केलेली संगीतरचना दीर्घ कंठसंगीतात मध्यंतरात वाजवलीजाणारी वाद्यवृंदरचना म्हणजे सिंफनी असे अनेक अर्थ आहेत, तसेचसिंफनी वादनासाठी जो मोठा वाद्यवृंद वापरला जातो, त्याला‘सिंफनीऑर्केस्ट्रा’ अशी संज्ञा आहे.
सोळाव्या शतकात पाश्चात्त्य संगीतात सिंफनी या प्रकाराचा उदय वविकास घडून आला. सोळाव्या शतकात सिंफनी म्हणजे विशिष्टवादकगटासाठी, वृंदवादनासाठी रचलेली संगीतकृती, एवढाच मर्यादितअर्थ प्रचलित होता मात्र पुढे अठराव्या शतकापासून एका विशिष्टस्वरुपाच्या वाद्यवृंदरचना-प्रकाराचा निर्देश सिंफनी या संज्ञेने केला जाऊलागला. सतराव्या शतकातील इटालियन ऑपेरातील ‘ओव्हरचर’(प्रास्ताविक संगीतरचना) या प्रकारातून सिंफनी हा प्रकार उत्क्रांतहोत गेला. त्याचे ‘सिन्फोनिआ’ हे रुप म्हणजे आधुनिक सिंफनीचापूर्वावतार होय. इटालियन संगीतकार ⇨ आलेक्सांद्रो स्कारलात्ती (१६६०–१७२५) याने नेपल्समध्ये १६९० च्या दशकात सिन्फोनिआहा रचनाप्रकार रुढ केला. सिन्फोनिआमध्ये द्रुत वा जलद, संथ व पुन्हाजलद अशा लयींच्या तीन मूव्हमेंट्स असत आणि त्या हलक्याफुलक्या, आल्हाददायी संगीतकृती असत. या सिन्फोनिआवरुन पुढे सिंफनी हाप्रकार विकसित झाला. सु. १७५० मध्ये जर्मनी व ऑस्ट्रिया येथीलसंगीतकारांनी सिंफनीरचनेच्या मूळ तीन मूव्हमेंट्समध्ये (द्रुत-संथ-द्रुतलयींच्या) ⇨ मिन्युएत या नृत्याबंधाच्या लयीची भर घातली, त्यामुळेसिंफनीरचना एकूण चार मूव्हमेंट्सची होऊ लागली. सिंफनीच्या सर्वसाधारण प्रचलित रचनाबंधात द्रुत, संथ, नृत्यात्म या लयींची व चौथी⇨ सोनाटा या संगीतरचना-प्रकारातील अशा चार मूव्हमेंट्स समाविष्टकरण्याचा प्रघात या काळापासून रुढ झाला. ऑस्ट्रियन संगीतकार⇨ योझेफ हायडन (१७३२— १८०९) हा आधुनिक सिंफनीचा जनकमानला जातो. त्याने एकूण १०६ सिंफनी रचल्या (रचनाकाल सु. १७५५— ९५) व या रचनाप्रकाराचा विकास घडवून आणण्यात मोलाचीकामगिरी बजावली. त्याने सिंफनीच्या भावनात्मक आशयाची व्याप्ती वाढवून, एक स्वतंत्र रचनाप्रकार म्हणून त्याला महत्त्व प्राप्त करुन दिले.त्याच्या सिंफनींतून त्याची सर्जनशिलता, भावनांची तीव्रता, अभिव्यक्तीचेवैविध्य, नाट्यात्म विरोधाभास आणि आशय व रचनाबंध ह्यांत अभिजातवृत्तीने साधलेला समतोल या गुणवैशिष्ट्यांचे दर्शन घडते. हायडनच्याकाळापासून पुढे सिंफनी हा वाद्यवृंदरचनेचा प्रमुख प्रकार बनला. ⇨ मोट्सार्ट (१७५६— ९१)या ऑस्ट्रियन संगीतकाराच्या शेवटच्याचार सिंफनीरचना (रचनाकाळ १७८६— ८८) या भव्य व लालित्यपूर्णसंगीतकृती असून त्या अभिजात सिंफनींचे उत्तम नमुने आहेत. त्याने पन्नाससिंफनीरचना केल्या,मोट्सार्टच्या अखेरच्या तीन सिंफनी (क्र. ३९, ४०व ४१) अभिजात सिंफनीरचनांचे सर्वोत्कृष्ट आविष्कार मानले जातात. जर्मन संगीतकार ⇨ बेथोव्हन (१७७०— १८२७) ह्याने रचलेल्या नऊसिंफनींनी या रचनाप्रकाराला भारदस्त वजन व प्रतिष्ठा प्राप्त करुनदिली. त्याची एरॉइका (इं. शी. ‘हिरॉइक’: रचनाकाळ १८०३-०४)ही प्रसिद्घ व भव्य सिंफनी भावाशयाची विशाल व्याप्ती व्यक्त करणारीआहे. सिंफनीची तिसरी प्रचलित मूव्हमेंट मिन्युएत बदलून त्याऐवजी ‘स्केर्त्सो’ हा नवा जोशपूर्ण, हलकाफुलका रचनाप्रकार त्याने वापरला.त्याची सिंफनी क्र. ४ ही उत्फुल्ल, आनंदी व नादमधुर असून त्यातकाष्ठसुषिर वाद्ये प्राधान्याने वापरली आहेत. त्याची क्र. ९ ची सिंफनी(कोरल) ही सिंफनीच्या वाद्यवृंदरचनेत मानवी आवाजाचा म्हणजेकंठसंगीताचा वापर प्रथमच करणारी पहिली सिंफनी होय. त्यात त्याने समूहगान व चार एकगायकी (सोलो) आवाजांचा वापर केला होता.सिंफनीरचनेतील या नवप्रवर्तनाचा वापर पुढे गुस्ताव्ह मालर (१८६०– १९११) या ऑस्ट्रियन संगीतकाराने मोठ्या खुबीने व अधिक प्रमाणातकेला. त्याच्या दहा सिंफनीरचना प्रसिद्घ आहेत, त्यांपैकी चार सिंफनींमध्ये त्याने कंठसंगीताचा वापर केला आहे. बेथोव्हनच्या सिंफनीरचनापाश्चात्त्य संगीतातील स्वच्छंदतावादी प्रवाहाच्या निदर्शक आहेत. अठराव्याशतकाच्या अखेरच्या व एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभाच्या पर्वातीलअनेक संगीतकारांनी बेथोव्हनपासून स्फूर्ती घेतली व त्याच्या सिंफनींचेनमुनादर्श समोर ठेवून आपल्या सिंफनी रचल्या. नंतरच्या काळातसिंफनीरचनांमध्ये अनेकविध प्रकारचे बदल होत गेले. ⇨ फ्रांट्स शूबर्टच्या (१७९७–१८२८) नऊ सिंफनीरचना बेथोव्हनचा प्रभावदर्शवितात आणि अभिजाततावादी व स्वच्छंदतावादी सौंदर्यगुणांची संमिश्र प्रचिती त्यांतून येते. फेंच संगीतकार ⇨ एक्तॉर बेरल्योझ (१८०३–१८६९) याच्यावरही बेथोव्हनचा प्रभाव होता. त्याच्या सिंफनी फँटॅस्टिक (१८३०) या महत्त्वाच्या संगीतकृतीतून त्याने ‘प्रोग्रँम म्यूझिक’(संगीतरचनेची कथेशी वा तत्सदृश कल्पनांशी सांगड घालण्याचीपद्घती) हा नवा क्रांतिकारक प्रयोग अंमलात आणला. त्याच्या सिंफनीरचनाफेंच स्वच्छंदतावादी शैलीचे आविष्कार आहेत. बेथोव्हनच्याप्रभावातून निर्माण झालेली सिंफनीरचनेची मध्यवर्ती परंपरा पुढे नेऊन,तिला विविध नवनव्या पैलूंची जोड देऊन ती विकसित करण्याचे कार्यअनेक संगीतकारांनी नंतरच्या काळात केले. त्यांत ⇨ फेलिक्स मेंडेल्सझोन(१८०९–४७), ⇨ रॉबर्ट शूमान (१८१०–५६), ⇨ योहानेस ब्राम्झ (१८३३–९७), ⇨ चायकॉव्हस्की (१८४०–९३), अंतॉनिन ड्वोर्झाक (१८०१–१९०४) प्रभृती संगीतकारांचा वाटा मोठा व महत्त्वाचा आहे. त्यांच्या सिंफनीरचना विषयांचे वैविध्य, अनेकविध भावभावनांचेप्रकटीकरण, शैलींचे वैविध्य व नावीन्य अशा गुणांनी संपन्न आहेत.मेंडेल्सझोनच्या पाच सिंफनी अभिजात रचना-प्रकारांत आहेत पण यारचनांतून अस्वस्थ, प्रक्षोभक भावस्थिती व श्वास रोखून धरणारी तीव्र गती यांचा प्रत्यय — विशेषतः त्यांच्या स्केर्त्सो मूव्हमेंट्सच्या रचनांतून – येतो.तो स्वच्छंदतावादी
वृत्तीचा निदर्शक आहे. रॉबर्ट शूमानच्या चारसिंफनींमध्ये स्वच्छंदतावादाचा परमोत्कर्ष आढळतो. त्यांतील भावगेयता, भाषाप्रवाह, नाट्यमयता, अनेक वाद्यांच्या स्वरमेळांचे वैविध्य हे गुणविशेष स्वच्छंदवृत्तीचे निदर्शक आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातसिंफनीरचनांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडून आले. योहानेस ब्राम्झच्याचार सिंफनींमध्ये आशय व रचनाबंध यांत राखलेला समतोल अभिजातवृत्तीचा निदर्शक आहे पण त्यांतील भावप्रकटनाचे सामर्थ्य व निरनिराळ्या वाद्यध्वनींच्या स्वरमेळांचे वैविध्य हे स्वच्छंदतावादाचा प्रभावदर्शविते. अंतॉन ब्रूकनर (१८२४–९६) या ऑस्ट्रियन संगीतकाराच्या नऊसिंफनी या भव्य संगीतकृती असून त्या आत्यंतिक व्यक्तिवादी शैलीच्यानिदर्शक आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रीय संगीताचाजोमदार प्रवाह व स्थानिक देशी लोकसंगीताचे विविध प्रकार व शैलीयांचे आंतरराष्ट्रीय संगीतात प्राबल्य निर्माण झाले. त्याचे प्रतिबिंब सिंफनीया रचना-प्रकारातही दिसून येते. उदा., रशियन संगीतकार चायकॉव्हस्कीच्या सिंफनीरचनांध्ये रशियाचे राष्ट्रीय संगीत व तेथील लोकगीतांच्या विविध शैली यांचे आविष्कार आढळतात. ड्वोर्झाकच्या नऊसिंफनींतून चेकोस्लोव्हाकियाच्या राष्ट्रीय लोकसंगीताचे पडसाद उमटले आहेत. त्यांत नृत्यबंधांच्या संगीतात्मलयींचाही वापर केला आहे.⇨ झां सिबेलिउसच्या (१८६५–१९५७) सात सिंफनी फिनलंडच्याराष्ट्रीय लोकसंगीताचा आविष्कार घडविणाऱ्या आहेत. विसाव्या शतकातसिंफनीच्या पारंपरिक रचना -प्रकाराला नवनवी परिमाणे देऊन त्याच्याअभिव्यक्तिची क्षमता व व्याप्ती वाढवण्यात सिबेलिउस व त्याबरोबरच शस्त कॉव्ह्यिच (१९०६–७५), ⇨ व्हॉन विल्यम्स (१८७२–१९५८), ⇨ स्ट्राव्हिन्स्की (१८८२–१९७१) इ. संगीतकारांचा वाटा मोठाआहे. स्वच्छंदतावादी सिंफनीरचना या काळात मागे पडल्या वसिंफनीच्या संगीतरचनांमध्ये नवनवी तंत्रे तसेच निरनिराळ्या संगीतकारांच्या व्यक्तिवादी शैलींचे विविधांगी, विपुल प्रयोग दिसू लागले.या संगीतकारांनी आपल्यासिंफनीरचनांमधील मूव्हमेंट्सची संख्याप्रचलित चारपेक्षा कमी वा अधिक ठेवून सिंफनीरचनांचे विविध प्रयोग केले.
इनामदार, श्री. दे.
सिंफनी-वाद्यवृंदरचना : पाश्चात्त्य संगीतात वाद्यवृंदवादनाचेअतिशय महत्त्व आहे. सिंफनी वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा) हा त्यापैकीच एकप्रकार आहे. या वाद्यवृंदप्रकारात जवळपास १२५ वाद्यांचा स्वरसमूहअसतो. यामध्ये लाकडापासून बनविलेला—काष्ठसुषिर (वुडविंड) वाद्ये — बासरी (फ्ल्यूट), ओबो, क्लॅरिनेट, बेस क्लॅरिनेट, बसून, कॉन्ट्रा बसून तसेच काहीवेळा इंग्लिश हॉर्न अशी वाद्ये असतात. पितळ वाद्यांमध्ये ट्रंपेट ट्रोंबोन, फ्रेंच हॉर्न आणि ट्यूबा यांसारखी वाद्येही येतात.टिम्पनी, बेस ड्रम यांसारखी आघातवाद्ये, ट्रायँगल, हार्प ही तंतूवाद्ये तसेचसध्याच्या काळात पियानोही वाजविला जातो. तारांच्या वाद्यांत प्रथमव्हायोलिन, द्वितीय व्हायोलिन, व्हायॉल, चेलो, डबल बेस अशाहीवाद्यांचा समावेश होतो. संगीतकार सिंफनीरचना लिहिताना या वाद्यांचाक्रम लक्षात घेऊनच त्यांचे संयोजन क्रमवार करत असतो. प्रथम ओळीमध्ये लाकडीवाद्ये, त्यानंतर पितळी वाद्ये, त्यानंतर शेवटी तार वाद्येअशा स्वरुपातच हे संगीत किंवा ही रचना लिहिली जाते.
या रचनेचा साधारण क्रम असा असतो : प्रथम ओळ–तीनबासरींकरिता दुसरी ओळ–दोनओबोंकरिता तिसरी ओळ–दोनक्लॅरिनेटकरिता चौथी ओळ–दोनबसूनकरिता पाचवी ओळ–चारहॉर्नकरितासहावी ओळ–एक ट्रंपेटकरिता सातवी ओळ–दोन ट्रोंबोन्सकरिता आठवीओळ–तिसरा ट्रोंबोन आणि ट्यूबाकरिता नववी ओळ – टिम्पनीकरिता दहावी ओळ–पहिल्याव्हायोलिनकरिता अकरावी ओळ–दुसऱ्या व्हायोलिनकरिता बारावी ओळ– व्हायोलिनकरिता तेरावी ओळ–व्हॉयोलिन चेलोकरिता चौदावी ओळ–मंद्रसप्तकातीलवाद्ये (कॉन्ट्रा बेस ) इत्यादी.त्याकरिता स्वरलिपी दिलेली असते. सिंफनीच्या रचनेमध्ये संपूर्णवाद्यवृंदाचे चार भाग असतात.
वैशंपायन, भारती
“