साबण वनस्पति : (सोप प्लँट्स). ज्या अनेक ⇨ओषधी, ⇨क्षुप  (झुडपे) व वृक्ष या निरनिराळ्या गटात असून त्यात ⇨सॅपोनिने  ही विषारी ⇨ग्लुकोसाइडे  वा तत्सम पदार्थ असतात, अशा वनस्पतींना साबण वनस्पती म्हणतात. त्यांच्या विशिष्ट भागांपासून पाण्यात भरपूर फेस होतो आणि त्यांचा उपयोग कपडे, दागिने धुण्यासाठी झिलईकरिता व औषधांतही होतो. या वनस्पतींसंबंधीचा तपशील पुढील तक्त्यात दिलेला आहे.  

वनस्पतीचे नाव

फेस निर्माण

करणारा भाग

वनस्पती आढळण्याचे स्थल

सोपबार्क (क्विलाजा सॅपोनॅरिया)

सुकी अंतर्साल

पेरू व चिली (अँडीज पर्वताच्या प. उतरणीवर).

सोपवर्ट क्वा बौन्सिंग बेट (सॅपोनॅरिया ऑफसिनॅलिस)

पाने व मुळे

यूरोप, प. आशिया, उ. अमेरिका व ग्रेट ब्रिटन.

काऊ हर्ब (सॅपोनॅरिया वॅकॅरिया) ⇨ रिठा (सॅपिंडस लॉरिफोलियस) त्याच्या प्रजातीतील इतर काही जाती

मुळे व फळे

जिप्सोफिला प्रजातीतील जाती

मुळे

पू. भूमध्य सामुद्रिक प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारत.

सेनेगा रूट (पॉलिगॅला सेनेगा)

मुळे

उ. अमेरिका.

अमोले (अगेव्ह हेटेराकँथा)

मुळे

नैर्ऋत्य अमेरिका.

अगर कॅलिफोर्नियन सोपरूट

(क्लोरोगॅलम पोमोरिडियानम)

कंद

नैर्ऋत्य अमेरिका.

झिगॅडेनुस व सँड लिली

(ल्युकोक्रिनम माँटॅनम)

प. अमेरिका.

पहा : साबण.

जमदाडे, ज. वि.