ऋद्धि-सिद्धि : ऋद्धी म्हणजे जीवनोपयोगी सर्व वस्तूंची समृद्धी. सिद्धी म्हणजे सफलता. ऋद्धी व सिद्धी या देवता आहेत त्या गणपतीच्या परिचारिका अथवा बायका आहेत, अशी प्रसिद्धी आहे. प्रजापती या देवाच्या सिद्धी व बुद्धी या दोन मुलींशी गणपतीचा विवाह झाल्याचे व त्यांना अनुक्रमे क्षेम व लाभ हे पुत्र झाल्याचे पुराणांत वर्णन आहे. कुबेराच्या पत्‍नीचेही ऋद्धी हे नाव आहे. योगशास्त्रातील अणिमादी अष्टसिद्धी प्रसिद्ध आहेत.

केळकर, गोविंदशास्त्री