एकलिंगजी : राजपुतांचे आराध्यदैवत असलेले क्षेत्र. अरवलीच्या पूर्वेकडील एका घळीत, उदेपूरापासून २२ किमी. उत्तरेस हे असून येथे एकलिंगजीचे संगमरवराचे मंदिर बांधलेले आहे. हे कोरीवकामाने युक्त असून इतरही अनेक मंदिरे येथे आहेत. एकलिंगजीचे मंदिर बाप्पारावळने बांधले असून हमीर व कुंभ ह्यांनी त्याचा जीर्णोध्दार केला. उदेपूरच्या महाराणांचे हे कुलदैवत असून अद्यापही येथे होणार्‍या उत्सवात जी पालखी निघते, तिला एका बाजूने महाराणा व दुसर्‍या बाजूने लोकांचे प्रतिनिधी यांनी खांदा दिलेला असतो.

शाह, र. रू.