उरावा : जपानच्या मध्य होन्शू प्रांतातील सैटामा जिल्ह्याचे मुख्य शहर. लोकसंख्या २,६९,३९७ (१९७०). हे टोकिओच्या ईशान्येस सु.२४ किमी. असून येथे प्राचीन शिंतोपंथाची अनेक मंदिरे आहेत. टोकिओच्या आसमंतात असल्यामुळे कामधंद्यानिमित्त राहणाऱ्या नागरिकांनी हे गजबजलेले असते. सैटामा प्रांतातील शेतमालाची ही प्रमुख बाजारपेठ आहे.सभोवतीच्या चेरी वृक्षांच्या राईमुळे उरावा निसर्गरम्य दिसते.

ओक, द. ह.