उत्खनन: विविध कामांसाठी मूळ जागी असलेली माती व खडक सैल करणे, उकरणे, दुसरीकडे वाहून नेणे व पसरणे या क्रियांचा उत्खननात समावेश होतो. धरणे व इमारती बांधणे, रस्ते तयार करणे, उपयुक्त खनिज निक्षेप खणून काढणे इत्यादींसाठी उत्खनन करावे लागते. याकरिता विविध प्रकारची यंत्रोपकरणे वापरण्यात येतात. निसर्गतः भूमिगत झालेले प्राचीन संस्कृतींचे विविध प्रकारचे अवशेष शोधून काढण्यासाठी पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात येते. अवशेषांची नासधूस होऊ नये म्हणून पुरातत्त्वीय उत्खनन साक्षेपाने करावे लागते.

पहा : खाणकाम पुरातत्त्वीय उत्खनन बांधकाम तंत्रे.

भदे, व. ग.