आसामलोटा : (लॅ. यूपॅटोरियम ओडोरॅटम कुल – कंपॉझिटी). सु. २५–३० सेंमी. उंचीचे वेलीसारखे चढणारे हे क्षुप (झुडूप) पश्चिम वेस्ट इंडीज बेटे, दक्षिण अमेरिका, आसाम, बंगाल इ. ठिकाणी आढळते. पाने केसाळ, लंबगोल, २–१२ सेंमी. दंतुर स्तबक [ → पुष्पबंध]  पांढरे किंवा निळे, छदमंडल लांब किंवा आखूड, छदे थोडी बाहेरची लहान, पुष्पासन अनावृत्त, पुष्पमुकुट सर्व सारखे, नलिकाकृती → फूल] फळे (संकृत्स्न) छेदित, पंचकोनी केसांसारखी संदले एकाच वर्तुळात पण अनेक [→ कंपॉझिटी]. हे आसामात व बंगालमध्ये तणासारखे वाढते. हे मत्स्यविष आहे. बागेत वाफ्याच्या कडेने शोभेकरिता लावतात.

 

अयापान टी :(लॅ. यूपॅटोरियम अयापाना). या नावाची आसामलोट्याच्या वंशातील एक लहान बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨षधी  बागेत लावतात फुले करडी-निळी असतात. पाने कडवट असून काढा रक्तस्रावरोधक आहे. वनस्पतीचा फांट उत्तेजक, पौष्टिक व स्वेदक (घाम आणणारा) सुक्या पानांचा व प्ररोहांचा (कोंबांचा) पाण्यातील अर्क हृदयक्रियेस उत्तेजक मळ साफ करणे व जखमा धुणे ह्यांकरिता वनस्पतीचा काढा व पानांचा रस फिलिपीन्समध्ये वापरतात.

पहा : वनस्पती, विषारी.

 

पराडकर, सिंधू अ.