ऑलिंपस : ग्रीसमधील पवित्र पर्वतश्रेणी. ग्रीसच्या पूर्वेकडील इजीअन समुद्रकिनाऱ्यालगत ही पसरली असून पर्वतांच्या शिखरांची सरासरी उंची २,७५० मी. आहे. यांतील ऑलिंपस नावाने ओळखले जाणारे शिखर २,९१० मी. उंच आहे. बहुतेक शिखरे हिमाच्छादित असतात. पेत्रा व टेंपे ह्या ऑलिंपस पर्वतश्रेणीमधील महत्त्वाच्या खिंडी होत. ऑलिंपस येथील देवांच्या निवास्थानाविषयीचे उल्लेख ग्रीक पुराणकथांतून आढळतात. होमरच्या इलियड महाकाव्यात येथील देवांचे, मुख्यतः झ्यूसचे वर्णन आढळते.
देशपांडे, सु. र.