ऑलगीन : क्यूबाच्या पूर्व भागातील व्यापारकेंद्र. लोकसंख्या ३,५०,२५० (१९६७). ऊस, कॉफी, तंबाखू, मका, मध, अंडी, फळे, गुरेढोरे यांची ही बाजारपेठ असून येथे लाकूड, कातडी, फर्निचर, कौले, तेल इत्यादींचे कारखाने आहेत. शहाराच्या आसमंतात सोने व मँगॅनीज यांच्या खाणी आहेत. या आधुनिक शहरात काही जुन्या स्पॅनिश वास्तुही आहेत. हे दळणवणाचे केंद्र असून येथे विमानतळ आहे. स्पेनविरुध्द झालेल्या १८६८–७८ च्या दशवर्षीय युध्दात व १८९८ च्या स्वातंत्र्ययुध्दात ऑलगीन प्रमुख केंद्र होते.
शहाणे, मो. शा.