आवाळू : त्वचेखाली उत्पन्न होणाऱ्या वेदनारहित आणि वसामय अथवा तंतुमय अर्बुदाला (शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे तयार होणाऱ्या निरुपयोगी गाठीला) आवाळू म्हणतात. हे अर्बुद सौम्य असून फार हळूहळू मोठे होत जाते. शस्त्रक्रियेने समूळ काढून टाकल्यावर पुन्हा होत नाही [ → अर्बुदविज्ञान ].

ढमढेरे, वा. रा.