आव : (प्रवाहिका). मलावाटे चिकट आणि बुळबुळीत पदार्थ पडणे या अवस्थेला ‘आव’ असे म्हणतात. व्यवहारात आवेचे पांढरी व लाल असे प्रकार मानतात. आव पडणे हे आतड्याच्या रोगाचे एक लक्षण असून निरनिराळ्या कारणांनी आतड्याला येणाऱ्या शोथामध्ये म्हणजे दाहयुक्त सुजेमध्ये ते दिसून येते. सामान्यतः पांढरी आव ⇨ बृहदांत्रशोथाचे (मोठ्या आतड्याच्या शोथाचे) लक्षण असून तांबडी अथवा रक्ती आव हे ⇨ आमांशाचे लक्षण असते.

आयुर्वेदीय चिकित्सा : पहा : आतुरचिकित्सा-प्रवाहिका.

आपटे, ना. रा.