आल्मेईदा, फ्रॅन्सिस्कू द : (सु. १४५०–१ मार्च १५१९). पोर्तुगालने जिंकलेल्या भारतातील प्रदेशाचा पहिला व्हाइसरॉय. त्याने पूर्व आफ्रिकेतील किल्वा व मोझँबीक तसेच भारतातील कोचीन, अंजदीव व कननोर येथे सागरी किल्ले बांधले. मलॅका व श्रीलंका येथे त्याने राजकीय व व्यापारी संबंध प्रस्थापित केले. अरबांबरोबरच्या लढाईत त्याचा मुलगा मारला गेला, म्हणून दीवजवळ अरबी आरमाराचा बीमोड करून त्याने पोर्तुगीजांचे सागरी वर्चस्व प्रस्थापित केले. स्वदेशी परतताना दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनजवळ हॉटेंटॉट जमातीशी झालेल्या चकमकीत तो मारला गेला.

चाफेकर, शं. गं.