आर्गली : मेंढीची सर्वांत मोठी व रानटी जात. सैबेरिया, मंगोलिया व तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात ही राहते. हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन असे आहे. आर्गलीची खांद्यापाशी उंची १·२० मी. आणि वजन १६० किग्रॅ. असते. मेंढ्याची शिंगे १·५ मी. लांब व वजनदार असून बाहेरच्या बाजूला वाकलेली असतात. शरीराचा रंग फिक्कट तपकिरी असतो. यांचे मोठे कळप असतात. आर्गली गवत खातो. यांचे डोळे आणि घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. प्रजोत्पादनाचा काळ हिवाळा असून पिल्ले जूनच्या सुमारास जन्मतात.
जोशी, मीनाक्षी