आयसोल्युसीन: एक शाखायुक्त ð ॲमिनो अम्ल. रेणवीय सूत्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणूप्रकार व त्यांच्या संख्या दाखविणारे सूत्र) C6H13NO2. आल्फा-ॲमिनो-बीटा-मिथिल एन-व्हॅलेरिक अम्ल किंवा २-ॲमिनो-३-मिथिलपेंटानॉइक अम्ल या नावांनीही ते ओळखले जाते. रेणूचे वजन १३१·११. बीट साखरेच्या मळीपासून अर्लिक यांनी १९०४ मध्ये आयसोल्युसीन प्रथम वेगळे केले. फायब्रिन, ग्लुटीन, अल्ब्युमीन व गोमांस यांच्यावर पँक्रियाटिक ट्रिप्सीन या एंझाइमाची (रासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त संयुगाची) विक्रिया करून हे अम्ल
मिळविले जाते. हीमोग्लोबिनाशिवाय (रक्तातील तांबड्या पेशींमधील रंगद्रव्याशिवाय) इतर सर्व प्रथिनांत ते २·१० प्रतिशत असते. शरीरपोषणाच्या दृष्टीने हे एक अत्यावश्यक ॲमिनो अम्ल आहे. उंदीर, कोंबडी, मानवादी प्राण्यांना हे आवश्यक ॲमिनो अम्ल आहे. ते अंड्यांच्या पांढऱ्या बलकातील प्रथिनात ८ भाग, केसिनामध्ये (दुधातील प्रथिनामध्ये) ६·६ भाग, मांसातील प्रथिनात ७ भाग, गव्हाच्या प्रथिनात ४·४ भाग, पेप्सिनामध्ये ९·७ भाग तर मानवी रक्तप्रथिनात फक्त ०·९ ते १·८ भाग असते. डी-व एल-आयसोन्युसीन आणि डी-व एल-ॲलोआयसोल्युसीन असे त्याचे चार प्रकाशीय समघटक (सारखे सूत्र असलेली पण निरनिराळे गुणधर्म व संघटन असलेली संयुगे) आहेत. त्यांपैकी एल-समघटकाची चव कडवट असते,तर डी-समघटक साखरेप्रमाणे गोड असतो. अंत:पूरित [ध्रुवित प्रकाशाचे दोन्हीकडे वलन दाखविणारे, → समघटक] समघटक चवहीन असतो. एल-आयसोल्युसीन ह्या समघटकाची संरचना (रेणूमध्ये अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना) वरीलप्रमाणे आहे.
२५० से. ला त्याचे भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत:
Pk1(COOH) : २·२६Pk2(NH3+) : ९·६८. समविद्युत् भार बिंदू : ६·०२
प्रकाशीय वलन : [a] D पाण्यात + १२·४०
[a] D ५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्ल + ३९·५०
[a] D ६ सममूल्यी ” ” + ४०·७० विद्राव्यता : (ग्रॅम/१०० मिलि. पाणी) ४·१२.
वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता ॲमिनो-अम्ले या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा.
मिथिल एथिल पायरूव्हिक एस्टर वापरून अथवा फिनिल हायड्रोझोन वापरून आयसोल्युसिनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात.
जैव संश्लेषण : आल्फा-कीटो-ब्युटिरिक अम्लाची सक्रियित (अधिक क्रियाशील केलेल्या) आल्डिहाइडाबरोबर प्रक्रिया होऊन आल्फा-ॲसिटो-आल्फा-हायड्रॉक्सि-ब्युटिरिक अम्ल तयार होते. मग ह्याचे रूपांतर आल्फा-बीटा-डायहायड्रॉक्सि-बीटा-मिथिल-व्हॅलेरिक अम्लात होते. ह्यातून पाण्याचा रेणू कमी केल्यावर आल्फा-कीटो-बीटा-मिथिल-व्हॅलेरिक अम्ल तयार होऊन ॲमिनांतरणाने (एंझाइमांनी ॲमिनो गटाचे स्थानांतर करून) आयसोल्युसीन तयार होते. ऑक्झॅलेॲसिटिक अम्लापासून ॲस्पार्टिक अम्ल मिळते, तर ॲस्पार्टिक अम्लापासून प्रथम होमोसिरीन, नंतर थ्रिओनीन आणि मग आल्फा-कीटो-ब्युटिरिक अम्ल मिळते. एल-आयसोल्युसीन हे ग्लुकोज-जनक तसेच कीटोनजनक अम्ल आहे. शरीरात त्याचे विघटन होऊन कोएंझाइम (एंझाइमाबरोबर आढळणारा व त्याच्या आवश्यक असलेला पदार्थ) – एच्या साहाय्याने प्रथम ॲसिटिल कोएंझाइम-ए व नंतर ॲसिटो- ॲसिटिक अम्ल मिळते. डी-ॲमिनो-ऑक्सिडेज ह्या एंझाइमामुळे आयसोल्युसिनापासून आल्फा-कीटो-बीटा-मिथिल-व्हॅलेरिक अम्ल तयार होते. अल्कोहॉली किण्वनामुळे (आंबवण्याच्या क्रियेमुळे) आयसोल्युसिनापासून ॲमिल अल्कोहॉल तयार होते.
चयापचय : व्हॅलीन आणि ल्युसीन यांच्या लयाप्रमाणेच, आयसोल्युसिनाचे प्राण्यांच्या पेशीत तुकडे होतात (सूत्र पुढील पानावर पहा). ह्यावरून असे दिसून येते की, दोन कार्बन अणूंपासून ॲसिटिल कोएंझाइम-एची निर्मिती होते आणि तीन कार्बन अणूंपासून ग्लुकोज तयार होते. माणसाच्या दररोजच्या आहारात आयसोल्युसीन कमीत कमी प्रत्येक किग्रॅ. वजनामागे २० मिग्रॅ. असावे. लहान मुलांना मात्र एका किग्रॅ. वजनामागे ९० मिग्रॅ. आयसोल्युसीन लागते. ७ ग्रॅम आयसोल्युसीन दररोजच्या आहारात किमानपक्षी असावे असे रोझ यांनी प्रयोगांवरून दाखविले आहे व म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने १·४० ग्रॅमांची शिफारस दररोजच्या आहाराकरता केली आहे.
मॅपल सायरप या आनुवंशिक चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडीत होणाऱ्या) मूत्ररोगात, आयसोल्युसिनाचा चयापयय योग्यप्रकारे न झाल्यामुळे त्याचे रक्तातील प्रमाण वाढून ते मूत्रावाटे बाहेर फेकले जाते. या मूत्राला मॅपल सायरपासारखा वास येतो. ल्युसीन, बीटा-हायड्रॉक्सिल्युसीन,
NH2 | |
अभिनांतरण |
+HS-CoA |
-2H |
|||||
CH3-CH2-CH-CH-COOH |
— |
CH3-CH2-CH-CO-COOH |
→ |
CH3-CH2-CH-CO-S-CoA |
→ ← |
|||
| CH3 |
| CH3 |
| CH3 |
||||||
आयसोल्युसीन |
आल्फा-कीटो-बीटा- मिथिल-व्हॅलेरिक अम्ल |
आल्फा-मिथिल-असिटो-असिटिल कोएंझाइम-ए |
||||||
+H2O |
DPN |
|||||||
CH3-CH=C-CO-S-CoA | |
→ ← |
CH3-CH-CH-CO-S-CoA | | |
→ ← |
CH3-CO-CH-CO-S-CoA | |
||||
CH3 |
-H2O |
DPN-H |
CH3 |
|||||
आल्फा-मिथिल-क्रोटोनिल कोएंझाइम-ए |
आल्फा-मिथिल-बीटा- हायाड्रॉक्सि ब्युटिरिल कोएंझाइम-ए |
आल्फा-मिथिल-असिटो-असिटिल कोएंझाइम-ए |
||||||
+HS-CoA |
||||||||
→ |
CH3-CH2-CO-S-CoA |
+ |
CH3-CO-S-CoA |
|||||
प्रोपिओनिल कोएंझाइम-ए ↓ ग्लुकोज (प्रतिकीटोनजनक) |
असिटिल कोएंझाइम-ए ↓ असिटो- असिटिक अम्ल (कीटोनजनक) |
मिथिल ग्लायसीन, सायक्लोपेंटेन ग्लायसीन ही संयुगे आयसोल्युसिनाची प्रतिरोधके (परस्पर विरोध करणारी) आहेत.
हेगिंष्टे, म. द.
“