आयसॉएटिस : (इं. क्विलवर्ट). वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरस यांची ने-आण करणारे शरीर घटक असणाऱ्या) अबीजी वनस्पतींपैकी ह्या

आयसॉएटिस : (१) घनकंद, मुळे व पाने यांसह वनस्पती (२) खोडाचा उभा छेद, (अ) वाहकवृंदाचा खालचा भाग, (आ) वाहकवृंदाचा वरचा भाग, (इ) मूलदंड, (ई) लघुबीजुककोश, (उ) प्रपट्टिका (३) लघुबीजुकपर्णाच्या तळातून घेतलेला आडवा छेद, (ऊ) लघुबीजुके, (४) गुरुबीजुकपर्णाच्या तळातून घेतलेला उभा छेद, (क) गुरुबीजुककोश, (ख) जिव्हिका, (ग) छदन.

 वंशाचा समावेश आयसॉएटेसी कुलात असून लेपिडोफायटा या विभागातील चार गणांपैकी ðआयसॉएटेलीझ  या गणात त्या कुलाचा अंतर्भाव होतो. तसेच आयसॉएटिस या विद्यमान वंशाशिवाय आयसॉएटाइट्स या क्रिटेशसकल्पाच्या पूर्वार्धातील (सुमारे तेरा कोटी वर्षांपूर्वीच्या) व जीवाश्म (अवशेष) रूपात आढळलेल्या वंशाचीही गणना होते. आयसॉएटिसाच्या सुमारे ६५ जाती असून त्यांपैकी सुमारे १९ अमेरिकेत आढळतातभारतात तुरळकपणे सर्वत्र, काही जाती दलदलीच्या ठिकाणी व काही जाती थोडे दिवस संपूर्णपणे कोरड्या जमिनीत वाढतात.

या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ओषधीय [→ ओषधि] वनस्पती सुमारे ५-५० सेंमी. उंच वाढतात. मूलक्षोड घनकंदासारखे [→ खोड]व द्विखंडी किंवा त्रिखंडी असून त्याच्या तळापासून अनेक आगंतुक द्विशाखाक्रमी मुळांचा झुबका येतो. खोडाच्या वरच्या बाजूस अनेक लांबट, किंचित ताठर अशा आराकृती हिरव्या पानांचा (आ. १) गुच्छ असतोसर्वांत बाहेरची वंध्य, मधली सापेक्षत: पक्व गुरू व लघू बीजुकपर्णे (लाक्षणिक प्रजोत्पादक अंग म्हणजे बीजुक धारंण करणारी रूपांतरित पाने) व सर्वांत आतल्या बाजूस अपक्व बीजुकपर्णे असा अनुक्रम आढळतो. खोडातील एकमेव वाहक वृंदाचा (जुडग्याचा) खालचा भाग (आ. २) मुळातील रंभाशी (मधल्या वाहक ऊतकयुक्त भागाशी) जोडलेला असून तो वरच्या उभ्या (दंडगोलाकार) भागाशी काटकोनात वाढतोदंडगोलाकार भागाचा संबंध पानांच्या वाहक ऊतकांशी (समान रचना व कार्य असलेल्या सूक्ष्म शरीर घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांशी) जोडलेला असतो. यामुळे येथे घनकंदांत खोड व मुळे धारण करणारा (मूलदंड) या दोन्हींचा समावेश होतो. मूलदंडाच्या तीन किंवा चार शाखा असतात. घनकंदाच्या माथ्यावर खाचेमध्ये अनेक कोशिकांचा विभाजी [→ विभज्या] भाग असतो. वाहक वृंदात मध्ये ð प्रकाष्ठ व त्याभोवती ðपरिकाष्ठ असतेअंतस्त्वचा नसते. परिकाष्ठाबाहेर ð ऊतककर असून त्यापासून आत व बाहेर काहीशी अनियमित द्वितीयक वाढ होते. प्राथमिक मध्यत्वचेचे प्रमाण बरेच मोठे असून त्यात अनेक वायुकोटरांमुळे भरपूर हवा खेळते. या ऊतकांमध्ये भरपूर स्टार्च असतो [→ शारीर, वनस्पतींचेवायूतक अंतस्त्वचा].

मुळात एक उत्केंद्र (एका बाजूस असलेले) संलग्न वाहक वृंद असून अंतस्त्वचेला एका बाजूस पूर्णपणे वेढणारी मध्यवर्ती पोकळी असते.

पानाचा तळभाग पसरट व फुगीर असून वरच्या बारीक भागात एक मध्यवर्ती वाहक वृंद व चार वायुमार्ग असतात शिवाय त्यासभोवार चार ð दृढोतकाचे पट्ट असतात पानाच्या पाण्यात न बुडलेल्या भागांवर त्वग्‌रंध्रे (पृष्ठभागावरील सूक्ष्म छिद्रे) असतात व त्यांचा खालच्या ð हरिमोतकाशी निकट संबंध असतो. बीजुकपर्णाच्या तळात एक बीजुककोश (आ. ३ व ४) गुच्छाच्या आतील बाजूकडे (अक्षसंमुख) असून त्याच्या टोकाजवळ पानाच्या टोकाकडे वळलेली पातळ जिव्हिका असते. बीजुककोश पर्णतलातल्या खाचेत असून त्यावरच्या पातळ वेष्टनास छदन म्हणतात. बीजुककोश बीजुकांच्या आकाराप्रमाणे दोन प्रकारचे (असमबीजुकत्व) असून त्यांचा विकास व संरचना यूस्पोरँजिएट प्रकारची [→ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी] असते. त्यांचे आवरण अनेक थरांचे असून न्यूनीकरणानंतर अनेक एकगुणित बीजुके निर्मिली जातात. बीजुककोशात आडवे पडदे (प्रपट्टिका) असतात. दोन्ही प्रकारच्या बीजुककोशांचा विकास प्रथम सारखा असतो. लघुबीजुकांची संख्या फारच मोठी असते. सर्वच बीजुकपर्णे कुजून गेल्यानंतर सुटी झालेली बीजुके वाऱ्याने किंवा कृमींनी पसरविली जातात. या वनस्पतीत गंतुकधारी (प्रजोत्पादक कोशिका असलेली वनस्पतीची अवस्था किंवा पिढी) फार र्‍हसित असून बीजुकातच त्यांचा विकास होऊन गंतुकाशये (प्रजोत्पादक कोशिका ज्यात तयार होतात असे भाग) बनतात. फक्त चार बहुकेसली (केसासारखी अनेक उपांगे असलेली) रेतुके (चल पुं-जनन कोशिका) व फार थोडे अंदुककलश (अचल स्त्री-जनन कोशिका धारण करणारे कलशासारखे भाग) असतात. फलनाने बनलेल्या रंदुकापासून (स्त्री व पुं-जनन कोशिकांपासून तयार झालेल्या भागापासून गर्भविकास होतो. पद असतो पण आलंबक (गंतुकाशयाचा तंतुरूप देठ) नसतो. मूळ व पान प्रथम व खोड नंतर जोमाने वाढून नवीन बीजुकधारी (मूळची वनस्पती) सुस्थित होतो. एकगुणित व द्विगुणित पिढ्यांचे एकांतरण [→ एकांतरण, पिढ्यांचे], इतर वाहिनीवंत अबीजींप्रमाणेच आढळते.

पहा : आयसॉएटेलीझ ऊतके, वनस्पतींतीलपुरावनस्पतिविज्ञान नेचे.

वैद्य, प्र. भ.