आर्नल्ड, हेन्‍री हार्ले : (२५ जून १८८६–१५ जानेवारी १९५०).  अमेरिकेतील सुप्रसिद्ध वैमानिक व दुसऱ्या महायुद्धातील वायुसेनाप्रमुख.  वेस्टपॉइंट लष्करी अकादमीतून शिक्षणक्रम पुरा झाल्यावर त्याला भूसैन्यात कमिशन मिळाले. सिग्नल कोअरमधील वायुगतिकी खात्यातील नेमणुकीनंतर त्याने सुप्रसिद्ध राईट बंधूंच्या मार्गदर्शनाखाली विमानविद्या शिकून अनेक विक्रम केले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याने पनामामध्ये सातव्या वायुपथकाचे आधिपत्य केले होते.  दुसऱ्या महायुद्धातील अतिमहत्त्वाच्या अमेरिकन लष्करी नेत्यांत त्याची गणना होते. युद्धातील विमानांचे महत्त्व लक्षात घेऊन त्याने १९३८ मध्ये अमेरिकेतील लढाऊ विमानांची संख्या दहा हजारांपर्यंत नेण्यावर भर दिला. अमेरिकेचे वायुदल बलशाली करण्यात आर्नल्डचा मोठा वाटा होतो.

पाटणकर, गो. वि.