आर्द्रताशोषक : आर्द्र (ओलसर) पदार्थातील पाणी शोषून घेणाऱ्या पदार्थांना आर्द्रताशोषक म्हणतात. उघड्यावर सुकू देऊन किंवा त्याच्यावरून हवेचा प्रवाह वाहील असे करून किंवा तापवून ओल्या पदार्थातील बहुतेक सर्व पाणी काढून टाकले जाते. परंतु पाण्याचा काही अंश तरी त्यांच्यात शिल्लक राहतो तो काढण्यासाठी आर्द्रताशोषक वापरतात. खाद्यपदार्थ व उद्योगधंदे यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शेकडो पदार्थांतील पाण्याचा असा अंशही काढून टाकावा लागतो. त्यासाठी निरनिराळे पदार्थ निरनिराळ्या रीतीने वापरले जातात. त्यांच्यापैकी मुख्य म्हणजे सिलिका जेल, सक्रियित (अधिक क्रियाशील बनविलेली) ॲ‌‍‌‍‌‍‍‌‌‍‌‍‌‍‌‌‍ल्युमिना किंवा कार्बन, निर्जन कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम परक्लोरेट व चुनकळी हे होत.

पहा : शुष्कीकरण.

कारेकर, न. वि.