हाल-१ : (इ. स. चे पहिले वा दुसरे शतक ). पैठणच्या सातवाहन वंशातील सतरावा राजा आणि ⇨ गाहा सत्तसई (संस्कृत रूप गाथा सप्तशती) ह्या महाराष्ट्री प्राकृतातील शृंगारप्रधान गीतांचा संकलक. संस्कृत-प्राकृत ग्रंथांत त्याच्याविषयी आलेल्या उल्लेखांवरून तो धर्मात्मा, दानशूर, लोकहितैषी व विद्याप्रेमी होता, असे दिसून येते. गाहा सत्तसईवरून हालाची जी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते, ती एक रसिक, काव्यशास्त्रज्ञ, ‘कवि-वच्छलङ्ख म्हणजेच कवींचा आश्रयदाता, अशी आहे. बाणभट्टादी संस्कृत ग्रंथकारांनी त्याला आदरांजली वाहिलेली आहे.
तगारे, ग. वा.
“