हार्मोटोम : झिओलाइट गटामधील हार्मोटोम-फिलिसाइट या शृंखलेतील एक खनिज. स्फटिक एकनताक्ष व त्याचे अंतर्वेशी (एकमेकांत घुसलेले) जुळे स्फटिक सामान्यपणे आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. क्रुसासारख्या विशिष्ट आकाराच्या स्फटिकांमुळे जोड व कापलेला या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून या खनिजाला आबे रने झ्यूस्त हॉय या भूवैज्ञानिकांनी हार्मोटोम हे नाव दिले (१८०१). पाटन स्पष्ट रंग मुख्यतः पांढरा, करडसर, पिवळसर व तपकिरी छटेचा चमक काचे-सारखी भंजन खडबडीत कस पांढरा कठिनता ४·५ वि. गु. २·४६ [→खनिजविज्ञान]. रा. सं. (K, Ba, Na)2 (Al, Si)

 

 (Si16O16)·6H2O. हे खनिज बेसाल्ट खडकातील पोकळ्यांमध्ये उष्ण पाण्याद्वारे साचतेकिंवा बेसाल्ट व त्यासारख्या खडकांत बदल होऊनही तयार होते. म्हणून याचे रासायनिक संघटन जटिल स्वरूपाचे व बदलणारे असते. नॉर्वे, बव्हेरिया, जर्मनी इ. प्रदेशांत आढळणारे हे खनिज भारतात क्वचितच आढळते. याला क्रॉस-स्टोन असेही म्हणतात. इतर झिओलाइटांप्रमाणे सुशोभनासाठी हार्मोटोम वापरतात.

 

पहा : झिओलाइट गट.

 

बरीदे, आरती