झामूएल हानेमान हानेमान, (क्रिस्टिआन फ्रीड्रिख) झामूएल :(१० एप्रिल १७५५–२ जुलै १८४३). प्रख्यात जर्मन शरीरक्रियावैज्ञानिकआणि ? होमिओपॅथी या वैद्यक शाखेचे संस्थापक.

 

हानेमान यांचा जन्म माइसन (सॅक्सनी, जर्मनी) येथे झाला. त्यांनी लाइपसिक व व्हिएन्ना येथे वैद्यकाचे शिक्षण घेऊन एर्लांगेन येथून एम्.डी. पदवी संपादन केली. नंतर त्यांनी अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय केला व १७८४ मध्ये ते ड्रेझ्डेन येथे स्थायिक झाले. त्यानंतर १७८९ मध्ये ते लाइपसिकला गेले. विल्यम कलेन यांच्या लेक्चर्स ऑन द मटेरिया मेडिका या ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद करताना हानेमान यांना त्यातील पुढील विधान वाचूनधक्काच बसला : ‘निरोगी (प्राकृत) शरीरांत क्विनिनामुळे निर्माण झालेली लक्षणे ही जो आजार बरा करण्या-साठी क्विनिनाचा उपचार करतातत्या आजारातील लक्षणांसारखी असतात ङ्ख. या निरीक्षणावरून त्यांनी पुढील सिद्धांत ठामपणे सादर केला : ‘सारख्या गोष्टी सारख्या बाबींकडून बऱ्या (रोगमुक्त) होतातङ्ख. म्हणजेज्या औषधांमुळे निरोगी शरीरात आजारांची लक्षणे निर्माण होतात तेआजार त्या सूक्ष्म प्रमाणातील औषधांनी बरे होतात. १७९६ मध्येप्रसिद्ध झालेल्या आपल्या शोधनिबंधात त्यांनी हे तत्त्व प्रसिद्ध केले. कणांचे आकारमान लहान करणारे सूक्ष्मीकरण अथवा द्रवाचे विरली-करण (अधिक पातळ करणे) यांच्यामुळे औषधे अधिक प्रभावीकिंवा गुणकारी होतात, हे आपले तत्त्व त्यांनी अधिक प्रगत अवस्थेतनेले. १८०० मध्ये औषधांच्या लहान मात्रा त्यांच्या बऱ्या करण्याच्याक्षमता प्रभावीपणे उपयोगात आणता येतात, याची त्यांनी खातर-जमाकेली. त्यांच्या Orgnon der rationellen Heilkunstc(१८१०इं. शी. ‘ऑर्गॅनॉन ऑफ रॅशनल मेडिसीन’) या प्रमुख ग्रंथात त्यांनी आपल्या चिकित्सा पद्धतीचे स्पष्टीकरण दिले आहे. या पद्धतीला त्यांनी होमिओपॅथी (समचिकित्सा वा अनुचिकित्सा) हे नाव दिले आहे. Reine Arzneimittellehre(१८११ इं. शी. ‘प्युअर फॉर्मॅकॉलॉजी’) या सहा खंडांच्या ग्रंथात असंख्य औषधांनी निर्माण झालेली, पारखलेली( सिद्ध अशी) लक्षणे तपशीलवार दिली आहेत.

 

औषधे तयार करून विकणाऱ्या मंडळींच्या शत्रुत्वामुळे त्यांना लाइपसिक सोडणे भाग पडले आणि अनहॉल्ट-कोथेनच्या ग्रँड ड्यूकच्या निमंत्रणावरून ते कोथेन येथे रहायला गेले. त्यानंतर १४ वर्षांनी तेफ्रान्समध्ये पॅरिसला गेले. तेथे त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसायआयुष्यभर उत्तम रीतीने केला व ते अतिशय लोकप्रिय डॉक्टर झाले.त्यांचा जन्मदिवस ‘विश्व होमिओपॅथी दिवस’ म्हणून सर्वत्र साजराकेला जातो.

 

हानेमान यांचे पॅरिस येथे निधन झाले.

 

पहा : होमिओपॅथी.

ठाकूर, अ. ना.