हसन–हुसेन : प्रेषित ⇨ मुहंमद पैगंबर यांचे हे नातू (मुलीची मुले) आणि इस्लामचे चौथे खलीफा (प्रेषित मुहंमदांचे जावई) हजरत ⇨ अली आणि प्रेषितांची कन्या हजरत बिबी फातिमा यांची ही मुले. चौथे खलीफा हजरत अली यांच्या मृत्यूनंतर खलीफापदासाठी वाद निर्माण झाला. सिरियाचा सुभेदार मुआविया हा सत्ताधारी झाला. त्याने उम्मदाद घराण्याची स्थापना केली. त्याचा मुलगा यझीद हा वारसदारझाला. त्याला प्रेषितांचा नातू हसन याच्याकडून मान्यता पाहिजे होती. यझीदच्या समर्थकांनी यझीदला भडकाविले. तो उन्मत्त झाला. त्याने हसनकडूनच मुजऱ्याची मागणी केली. हसन हा प्रेषितांचा नातू असल्याने त्याने त्याच्यासमोर झुकण्यास नकार दिला. यझीद याने त्याच वेळीमक्केतील एका रहिवाशाची सुंदर बायको बळकाविण्याचे कारस्थान सुरू केले. हसन याने ते होऊ दिले नाही. त्यामुळे यझीद चिडला. त्याने दगाबाजी करून हसनची हत्या करवली.
भावाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी इमाम हुसेन मूठभर अनुयायी घेऊन युद्ध करायला गेला. करबलाच्या मैदानावर झालेल्या या एकतर्फी लढाईत इमाम हुसेनही मारला गेला. हे युद्ध ⇨ मोहरम च्या महिन्यात झाले, म्हणून हजरत अली आणि त्यांची मुले यांना मानणारे ⇨ शिया पंथा चे अनुयायी मोहरम महिन्यात ‘दुःखमय महिना’ म्हणून शोकप्रदर्शन करतात.पहा : खिलाफत ताबूत मोहरम (मुहर्रम ).
बेन्नूर, फकरूद्दीन
“