ग्वेलिन : चीनच्या ग्वांगसी प्रांताची जुनी राजधानी. लोकसंख्या सु. २,३५,००० (१९७०). हे महत्त्वाचे वाहतूक केंद्र हूनान-ग्वांगसी लोहमार्गावर ग्वे नदीच्या सुपीक खोऱ्यात असून येथील उंच सुळक्यांच्या सृष्टिसौंदर्याने अनेक चिनी चित्रकारांना स्फूर्ती दिलेली आहे. सूत, कापड, तुंग तेल, साखरशुद्धी, कागद इ. ग्वेलिनचे व्यवसाय असून शेतमाल व लाकूड यांची येथून निर्यात होते. ग्वेलिनला ग्वांगसी राष्ट्रीय विद्यापीठ, ग्वांगसी कृषिसंस्था व प्रांतिक संग्रहालये आहेत.      

             

ओक, द. ह.