ग्वेयांग : चीनच्या ग्वेजो प्रांताची राजधानी. लोकसंख्या सु. १५,००,००० (१९७०). ग्वांगसी लोहमार्गावरील १,०४० मी. उंचीवरील ग्वेयांग, जवळच्या कोळसा खाणींमुळे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. सुती व रेशमी कापड, पोलाद, काच, आगपेट्या, शाई, कागद, रसायने, तंबाखू इ. व्यवसाय येथे असून धान्य, कातडी, वनस्पती तेल, औषधे येथून निर्यात होतात. हे टोळीवाल्या लोकांसाठी कारभार केंद्र आहे. येथे राष्ट्रीय अल्पसंख्याक संस्था व ग्वेयांग विद्यापीठ आहे.
ओक, द. ह.