गोंदिया : भंडारा जिल्ह्यातील तहसिलीचे ठिकाण. लोकसंख्या ७७,९९२ (१९७१). मुंबई—कलकत्ता रुंदमापी रेल्वेमार्गावरील हे प्रस्थानक, नागपूरच्या १२० किमी. ईशान्येस असून येथून जबलपूर व चंद्रपूर या शहरांकडे अरुंदमापी रेल्वेमार्ग जातात. भंडारा जिल्ह्यातील तांदूळ, तंबाखू, लाकूड इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. येथे काच व लाख शुद्ध करण्याचे आणि विड्या तयार करण्याचे कारखाने तसेच धान कुटण्याच्या (भात सडण्याच्या) गिरण्या आहेत. येथे माध्यमिक शाळा, महाविद्यालय व रुग्णालय आहे. 

जोशी, चंद्रहास