गॉर्डियस : नेमॅटोमॉर्फा संघातील गॉर्डिइडी कुलातील हा कृमिसदृश प्राणी आहे. गॉर्डियस हे वंशाचे नाव असून सामान्य जातीचे शास्त्रीय नाव गॉर्डियस अक्वाटिकस असे आहे. याच्या शरीराची लांबी १५-१६ सेंमी. व व्यास फक्त ०·५ मिमी. असतो. सर्व जगातील दमट मातीत किंवा गोड्या पाण्यात हा आढळतो. तो जलवनस्पतींच्या खोडांभोवती वेटोळी घालून राहतो. पाण्यात तो पोहू शकतो. ⇨ नेमॅटोमॉर्फा या नोंदीत दिलेली शरीररचनेची व जीवनवृत्ताची माहिती यालाही लागू पडते.
कर्वे, ज. नी.