चुर्क: उत्तर प्रदेश राज्याच्या मिर्झापूर जिल्ह्यातील रॉबर्ट्सगंज तालुक्यातील ठिकाण. लोकसंख्या ७,४२९ (१९७१). हे मिर्झापूरच्या आग्नेयीस ८० किमी. मिर्झापूर – चंदव (बिहार) रस्त्यावर असून उत्तर रेल्वेचा चुनार ते चुर्क असा फाटा आहे. येथे शासकीय सिमेंट कारखाना असून मरकुंडीजवळील चुनखडीच्या साठ्यांचा या कारखान्यात उपयोग केला जातो. चारही भट्ट्या मिळून या कारखान्याची दररोज २,१०० टन सिमेंट उत्पादन क्षमता आहे.
कांबळे, य. रा.
“