एव्हॅन्झव्हिल : अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील व्यापार, उद्योग व दळणवळण ह्यांचे केंद्र. लोकसंख्या १,३८,७६४ (१९७०). हे इंडियानापोलिस शहराच्या नैर्ऋत्येस २३३ किमी., ओहायओ नदीकाठी वसले आहे. शहराच्या आसमंतात कोळशाच्या खाणी असून शेतीउत्पादनही चांगले होते. लाकडी सामान, मोटारीचे भाग, प्रशीतके, विद्युत् साहित्य, खनियंत्रे, काचसामान, चिरूट, औषधे, कापड, रसायने यांचे उत्पादन महत्त्वाचे आहे. दुसऱ्या महायुद्धात येथे मोठ्या प्रमाणात जहाजे बांधली जात असत. एव्हॅन्झव्हिल महाविद्यालय व वेड्यांचे इस्पितळ अशा दोन मोठ्या संस्था येथे आहेत.

लिमये, दि. ह.