केरळ कृषि विद्यापीठ : केरळ राज्यातील एक कृषी विद्यापीठ. या कृषी विद्यापीठाची स्थापना त्रिचूर येथे १ फेब्रुवारी १९७२ मध्ये झाली. विद्यापीठाची तीन घटक महाविद्यालये असून त्यांपैकी एक उद्यानविज्ञान विषयाचे आहे. विद्यापीठाचे मुख्य कार्यक्षेत्र त्रिचूरचे उपनगर मन्नूथी येथे व दुसरे केंद्र वेल्लायनी येथे आहे. विद्यापीठाच्या अखत्यारीत २१ संशोधनकेंद्रे आहेत. नजीकच्या भविष्यकाळात मूलभूत भौतिकशास्त्रे व मानव्यविद्या, मच्छीमारी आणि गृहविज्ञान या विषयांची महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. विद्यापीठाने सुरुवातीपासूनच त्रिसत्रीय परीक्षापद्धती अवलंबिली आहे.                             

देशपांडे, सु. र.