केरवाँ : केरवाँ. उत्तर आफ्रिकेत ट्युनिशियामधील मुसलमानांचे यात्रेचे पवित्र स्थान. लोकसंख्या ८२,२९९ (१९६६). हे लोहमार्गाने ट्यूनिसच्या दक्षिणेस १२९ किमी. आहे. शहरात अनेक प्राचीन व सुंदर मशिदी आहेत. चामड्याच्या वस्तू व गालिचे यांचे येथील उत्पादन महत्त्वाचे आहे. अन्नधान्ये, ऑलिव्ह, लोकर, मेंढ्या व कातडी यांचा येथील व्यापार मोठा आहे. सिद्दी ओक्बा ह्या अरब योद्ध्याने ६७१ मध्ये हे शहर स्थापले त्याच्या नावाची एक मोठी मशीद येथे आहे. येथील तटबंदी, वेशी, जलाशय व बाजार प्रेक्षणीय आहेत.
लिमये, दि. ह.