कोलोसोकीलिस ॲटलास : गतकालीन कासवाच्या एका जातीचे नाव. या जातीतील एका प्राण्याच्या शरीराच्या काही अस्थींचे व पृष्ठवर्माच्या (पाठ झाकणाऱ्या कायटिनमय व अस्थियुक्त ढालीसारख्या संरचनेच्या) काही भागांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) हरिद्वारजवळच्या टेकड्यांतील शिवालिक संघातील गाळाच्या खडकांत आढळलेले आहेत. या प्राण्याचे आकारमान प्रचंड होते. याची लांबी ६·५ मी. एवढी होती, असे त्या सापडलेल्या  जीवाश्मांवरून कळून येते. या प्राण्याचा काळ प्लाइस्टोसीन काळाच्या (सु. ६ लाख वर्षांपूर्वीच्या) प्रांरभीचा आहे.

ठाकूर, अ. ना.