क्रॉस: ख्रिस्ती धर्मातील एक पवित्र प्रतीक. ⇨येशू ख्रिस्ता ने मानवाच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून क्रॉसवरकॅलव्हरी-क्रॉस, जेरूसलेम : यातील तीन पायऱ्या विश्वास, आशा आणि औदार्य यांचे प्रतीक मानल्या जातात.

(क्रुसावर) मरण पतकरले आणि तो मृत्यूवर विजयी झाला, ह्या ख्रिस्ती विश्वासाच्या (फेथ) परंपरेनुसार क्रॉस हे पवित्र विजयाचे प्रतीक मानले जाते. ख्रिस्ती उपासनेत तसेच जीवनातही क्रॉसला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. क्रॉसवर विपुल प्रवचने, काव्ये व ग्रंथ लिहिले गेले. म. गांधींच्या आवडत्या गीतातील क्रॉससंबंधीच्या इस्साक वॅट्स (१६७४–१७४८) याच्या पुढीलओळी प्रसिद्ध आहेत : ‘व्हेन आय सर्व्हे द वंडरस क्रॉस/ऑन विच द प्रिन्स ऑफ ग्लोरी डाइड/माय रिचेस्ट गेन आय काउंट बट लॉस/अँड पोअर कंटेंप्ट ऑन ऑल माय प्राइड’.

क्रॉसचे अनेक प्रकार असून त्यांतील (१) अधिक चिन्हासारख्या, एक उभी व एक आडवी अशा पट्ट्यांचा आणि (२) गुणाकार चिन्हांसारख्या तिरप्या दोन पट्ट्यांचा, हे प्रमुख होत. येशू ख्रिस्ताच्या काळी रोमन लोक गुन्हेगारांना क्रॉसवर खिळ्याने डांबून ठार मारत.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)