कोपेत दा : रशिया-इराण सरहद्दीवरील तुर्कमेन-खोरासान पर्वतराजीचा एक भाग. इराणच्या खोरासान विभागात आणि रशियाच्या तुर्कमेन सोव्हिएट प्रजासत्ताकात ५६० पू. ते ६०० पू. यांदरम्यान सु. ३,००० मी. उंचीची ही पर्वतराजी ३२० किमी. पसरलेली आहे. तिची दिशा वायव्य –आग्नेय असून तिच्या उत्तर उतरणीवर रशियाचे फीर्यूझा हे थंड हवेचे ठिकाण आहे. उंचावरील भागात स्टेप वनस्पती आढळते. तुर्कमेन सोव्हिएट प्रजासत्ताकातील काही लोकवस्ती याच्या पायथ्याशी असलेल्या मरूद्यानांत केंद्रित झाली आहे. रशियातील अश्काबाद ते इराणमधील कूचानपर्यंत जाणारा महामार्ग कोपेत दाला ओलांडून जातो. ट्रान्स-कॅस्पियन लोहमार्ग याच्या उत्तर पायथ्याजवळून जातो.
कुमठेकर, ज. ब.
“