गणपतिपुळे : रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहराच्या उत्तरेस सु. ४८ किमी. वरील स्वयंभू गणपतीचे एक क्षेत्र. हे अरबी समुद्र किनारी डोंगरपायथ्याशी वसलेले असून १६०० पासून या देवस्थानची माहिती उपलब्ध आहे. हे स्थान निसर्गरम्य असून जागृत असल्याचे मानतात. येथे भाद्रपद आणि माघ शुद्ध चतुर्थीचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात. भाविकांशिवाय रत्नागिरीला जाणारे प्रवासी गणपतिपुळ्याला भेट देतात.
कापडी, सुलभा
“