गढमुक्तेश्वर : उत्तर प्रदेश राज्याच्या मीरत जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १०,९३७ (१९७१). हे गंगेच्या उजव्या तीरावर, मीरतपासून ४५ किमी. आग्नेयीस असून दिल्ली-मुरादाबाद रेलमार्ग व हमरस्ता गढमुक्तेश्वरहून जातात. प्राचीन हस्तिनापूरचा भाग म्हणून याचे वर्णन आढळत असले, तरी आजचे हस्तिनापूर गढमुक्तेश्वरच्या ४० किमी. उत्तरेस आहे. गंगा नदीकाठचे तीर्थक्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध असून येथे गंगेची चार मंदिरे मुक्तेश्वरादी अनेक मंदिरे पापविमोचन कुंड व तीर्थे ऐंशीहून अधिक सतीस्तंभ आहेत. कार्तिकी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. येथे एक जुना किल्ला असून तेराव्या शतकातील मशीद आहे.

कापडी, सुलभा