एंटेबे : पूर्व आफ्रिकेतील युगां डा देशाची भूतपूर्व राजधानी. लोकसंख्या १०,९०० (१९६९). व्हिक्टोरिया सरोवराच्या वायव्य तीरावरील भूशिरावर, समुद्रसपाटीपासून१,१४६ मी. उंचीवरहेशहर वसले आहे. हवामान वर्षभर समशीतोष्ण असल्यानेयेथेगौरवर्णियां ची बरीच वस्ती आहे. शहराच्या आसपास सुंदर फुलबागाव फळबागा असून येथील वनस्पती-संग्रहालय जगप्रसिद्ध आहे.पावणेदोनशेहेक्टर जागा व्यापणार्‍या यासंग्रहालयात विविय वनस्पती आहेत.याशिवाय येथे एक पशुवैद्यकीय संशोधनकेंद्र व व्हावरस सेंर आहे. ३४ किमी. उत्तरेस असलेल्या कांपाला या युगांडाच्या राजधानीशीहे सडकेने जोडलेले आहे. व्हिक्टोरिया सरोवरातील जलमार्गावरील हे महत्त्वाचे बंदर असून शहराकल्पना एक मोठाआंतरराष्ट्रीयविमानतळ आहे.शहराच्या परिसरात कापूस, कॉफी,केळी इत्यादींचे उत्पन्नहोतअसले, तरी शहरात कोणतेही मोठे कारखाने नाहीत.

लिमये, दि. ह.