गडनायक, राधामोहन : (? –१९११). आधुनिक ओडिया कवी आणि टीकाकार. त्यांचा जन्म ओरिसात धेनकानाल जिल्ह्यातील एका खेडेगावी खानदानी जमीनदार कुटुंबात झाला. ऐन तारुण्यात शिक्षण सोडून ते स्वातंत्र्य आंदोलनात सामील झाले. नंतर त्यांनी आपले आयुष्य साहित्यसंस्कृतीसंबंधीच्या व्यासंगात व्यतीत केले आणि एक उत्कृष्ट कवी व टीकाकार म्हणून मान्यता मिळविली. ओडिया छंदशास्त्राचा त्यांचा उत्कृष्ट व्यासंग असून त्यात त्यांनी सखोल संशोधनही केले आहे. त्यांचे आजवर सु. तेरा काव्यग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्यांत त्यांनी विविध विषय व वेगवेगळे काव्यप्रकार हाताळले आहेत.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर, द. स. (म.)