कोणाश्म : (संकोणाश्म). दगडाचे धारदार कडा असलेले लहान-मोठे तुकडे व कमीअधिक वाळू ही एकत्र चिकटविली जाऊन तयार झालेल्या खडकाला कोणाश्म म्हणतात.कोरड्या वाळवंटी किंवा शीत प्रदेशातील डोंगरांच्या जास्त उताराच्या पायथ्याशी साचलेल्या डबराचे सुटे घटक चिकटविले जाऊन कोणाश्म तयार होतात.याचे उत्पत्तीच्या तऱ्हेनुसार पडलेले दलन किंवा विभंग (खडकांना भेगा पडताना घासटले जाऊन निर्माण होणारे) कोणाश्म, प्रवाह कोणाश्म, आंतरस्तरीय (थरांच्या आतील) कोणाश्म आणि ज्वालामुखी (अंतर्वेशी, घुसलेले) कोणाश्म किंवा ⇨ ॲग्लोमरेट हेही प्रकार आसतात.
पहा : गाळाचे खडक.
ठाकूर, अ. ना.