गंधमादन : प्राचीन भारतीय साहित्यात आढळणारा एक पर्वत. ‘हिमालयासह सात पर्वतांनी वेढलेला’ असे याचे वर्णन असून काही विद्वानांच्या मते आधुनिक एल्बर्झ पर्वत म्हणजेच गंधमादन होय. सुगंधी वनस्पतींमुळे पर्वतास हे नाव मिळाले असावे. हे नरनारायणाचे निवासस्थान मानले गेले असून कुबेर, पुरुरवा-उर्वशी, पांडव आदींचा गंधमादनाशी संबंध आढळतो. गौतम बुद्धही येथे येऊन गेल्याचा जातकात उल्लेख आढळतो.

कापडी, सुलभा