कोटोनू : आफ्रिकेतील दाहोमी प्रजासत्ताकाचे गिनीच्या आखातवरील प्रमुख बंदर व व्यापारी केंद्र. लोकसंख्या २,०८,००० (१९७० अंदाज). येथून २४ किमी. वरील पोर्तोनोव्हो राजधानीला रेल्वेने जाता येते. ताडफळाचा गर, ताडतेल, खोबरे, कॉफी, कापूस यांची येथून निर्यात होते. मुख्यत: सिमेंट, पेट्रोलियम, साखर, तांदूळ यांची आयात होते. वनस्पती तेल, साबण, सोडावॉटर, पादत्राणे, लाकूड कापणे यांचे येथे कारखाने आहेत. येथे विमानतळ व वनस्पतिउद्यान आहे.

कुमठेकर, ज. ब.