गंडूष : मुखरोगावर उपयुक्त उपचार तोडांत द्रव औषध धारण करणे. प्रकार : (१) गंडूष : तोंड भरून औषध धरणे. (२) कवल : तोंडात घेतलेले औषध इकडून तिकडे हलविता येईल इतक्याच प्रमाणात घेणे.
चिकित्सा प्रकार : (१) स्निग्ध : गोड, आंबट, तिखट व स्नेह यांमुळे औषध वातावर उपयुक्त. (२) शमन : कडू, तुरट, गोड औषध पित्तावर उपयोगी. (३) शोधन : कडू, तिखट, आंबट, खारट, उष्ण व क्षार औषध कफाचे शोधन करते. (४) रोपण : तुरट, कडू औषध तोंडातील व्रणाचे रोपण करते. गंडूषाचा हीन योग वा अतियोग म्हणजे कमी वा जास्त हाऊ नये सम्यक् योगाने रोगनाश होतो.
जोशी, वेणीमाधवशास्त्री