गंजाम : ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्वाचे स्थळ. हे कलकत्ता – मद्रास लोहमार्गावर कलकत्त्याच्या ५७० किमी. नैर्ऋत्येस, बंगालच्या उपसागरावर ऋषिकूल्य नदीच्या मुखाशी वसले आहे. प्रचीन काळी हे भरभराटलेले बंदर होते. अठराव्या शतकात फ्रेंचांनी व ब्रिटिशांनी येथे वखारी उघडल्या होत्या. १८१५ पर्यंत हे जिल्ह्याचे ठिकाण होते. एकोणिसाव्या शतकात गाळ साचून बंदर निरुपयोगी बनल्यामुळे, महामारीच्या साथीमुळे त्याचप्रमाणे व्यापारउद्योग बेऱ्हमपूर, छत्रपूर या शहरांकडे वळल्याने गंजामचे महत्त्व नष्ट झाले.

शाह, र. रू.