पानफुटी : (पान फुइ हिं. अस्थिभक्ष, जखम-ए.हयत क. लोन्नाहडकन गिड सं. अस्थिभक्ष्य, पर्णबीज इं. एअर प्लँट, लाइफ
फ्लँट लॅ व्रायोफायलम कॅलिसीनम, कलांचो पिनॅटा कुल-क्रॅसुलेसी). सु. ०.३-१.२ मी. उंच वाढणारी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) रसाळ ⇨ ओषधी मूळची उष्ण आफ्रिकेतील असून उष्ण कठिबंधात सर्वत्र आढळते. भारतात व इतरत्र सामान्यपणे शोभेकरिता सापेक्षतः कमी पाणी असलेल्या जागी लावतात व रानटी अवस्थेतही आढळते. खोड साधारण चौधारी, लालसर व पोकळ पाने साधी, क्वचित संयुक्त, मांसल, लंबगोलाकृती, स्थूलदंतुर (बोथट दात्यांची), समोरासमोर, ७-१५ सेंमी. लांब फुले घंटेप्रमाणे लोंबती फुलोरा टोकाकडे समोरासमोर फांद्या असलेली परिमंजरी [→ पुष्पबंध] संवर्त व पुष्पमुकुट नलिकाकृती, हिरवट तांबडे [→ फूल] पेटिकाफळे चार व सुकलेल्या संवर्त आणि पुष्पमुकुटाने वेढलेली असतात. बिया अनेक, लहान व गुळगुळीत. तर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ क्रॅसुलेसी कुलात (धायमारी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
“