क्षितिज : एखाद्या विस्तीर्ण व सपाट माळावर किंवा समुद्रावर उभे राहून सभोवार पाहिले असता, आकाश पृथ्वीला वर्तुळाकार रेषेत चिकटलेले दिसते, या वर्तुळाला क्षितिज म्हणतात. हे दृश्य क्षितिज होय. घरे, डोंगर, झाडे, समुद्रावरच्या लाटा इ. अडथळ्यांमुळे सपाट व विस्तीर्ण भाग सापडणे कठीण आहे परंतु जेवढा असा भाग दिसेल त्यावरून पूर्ण क्षितिजाची कल्पना येते. पृथ्वीच्या गोलपणामुळेच क्षितिज वर्तुळाकार दिसते. दृश्य क्षितिज हा पृथ्वीचा भाग आहे. पृथ्वीच्या गोलाची कड मधे आल्यामुळे या वर्तुळाच्या पलीकडील पृथ्वीचा भाग आपणास दिसत नाही. दृश्य क्षितिज हे अमर्याद नाही.
पुढे दिलेल्या आकृतीमध्ये म हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बिंदू, तर न हा द्रष्ट्याचा डोळा, मन पृष्ठभागापासून डोळ्याची उंची, नस व नर या पृथ्वीच्या गोलाला स्पर्शरेषा तर स आणि र यांमधून जाणारे लघुवर्तुळ म्हणजे दृश्य क्षितिज. अफाट अंतराळाच्या मानाने मन हे अंतर नगण्य आहे. म येथे पृथ्वीला काढलेले स्पर्शप्रतल अमर्याद वाढविल्यानंतर ते खगोलालाज्या ठिकाणी छेदते, त्या काल्पनिक वर्तुळास खगोलीय क्षितिज म्हणतात. ख हे खस्वस्तिक असले, तर खगोलीय क्षितिजाचा कोणताही बिंदू खस्वस्तिकापासून ९०°अंतरावर असतो. अमर्यादपणामुळे म किंवा न येथे खगोलीय क्षितिज एकच असणार. आकाशस्थ ज्योतींचे (चंद्र, सूर्य, ग्रह, तारे यांचे) उदयास्त दृश्य क्षितिजावर दिसतात. तसेच त्यांचे ⇨ उन्नतांश ही दृश्य क्षितिजापासूनच मोजले जातात. दृश्य क्षितिज खगोलीय क्षितिजाच्या किंचित खाली असेल. प्रत्यक्ष पाहिलेल्या दृश्य क्षितिजावरील उदयास्तांना किंवा उन्नतांशाला नतिकोन वजा करून खगोलीय संदर्भात उदयास्त व उन्नतकोन समजतील.
वेगवेगळ्या उंचींवरून दिसणाऱ्या दृश्य क्षितिजांची अंतरेउंची मी.
क्षितिज किमी. |
उंची मी. |
क्षितिज किमी. |
|
१ |
३.९ |
५० |
२७.६ |
२ |
५.५ |
१०० |
३९.० |
३ |
६.८ |
१५० |
४७.८ |
४ |
७.८ |
२०० |
५५.१ |
५ |
८.७ |
५०० |
८७ |
१० |
१२.३ |
१००० |
१२३ |
१५ |
१५.१ |
१५०० |
१५१ |
२० |
१७.४ |
२००० |
१७४ |
३० |
२१.४ |
४००० |
२४६ |
४० |
२४.६ |
५००० |
२७६ |
समुद्रसपाटीपासून किंवा भूपृष्ठापासून द्रष्टा जसजसा वर वर जाईल, तसतसा त्याला दिसणाऱ्या दृश्य क्षितिजाचा विस्तार कसा वाढत जातो, हे तक्त्यावरून समजेल.
काजरेकर, स. ग.
“