होल्मियम : लँथॅनाइड मालेतील विरल मृत्तिका धातू. रासायनिक चिन्ह Ho अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ६७ अणुभार १६४.९४ वि.गु. ८.७८१ (२५° से.ला) वितळबिंदू १,४७४° से. उकळबिंदू २,७००° से. रंग रुपेरी आवर्त सारणीच्या (रासायनिक मूलद्रव्यांच्या कोष्टकरूपाने केलेल्या विशिष्ट मांडणीच्या) गट ३ मधील हे संक्रमणी मूलद्रव्य नैसर्गिक स्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच परंतु भिन्न द्रव्यमानांक असलेल्या त्याच मूलद्रव्याचा प्रकार) Ho-१६५ तसेच इतर सु. २४ कृत्रिम समस्थानिक माहीत आहेत. होल्मियम ही धातू सर्वांत जास्त समचुंबकीय आहे परंतु तिचे तापमान कमी करीत गेल्यास ती बदलून प्रतिलोह चुंबकीय व नंतर लोहचुंबकीय होते. होल्मियमाचा आढळ कमी असून तिच्या संयुगांचा थोड्या प्रमाणात उपयोग करता येतो. 

 

स्वित्झर्लंडचे वैज्ञानिक जे. एल्. सॉरेट यांनी १८७८ मध्ये होल्मियमाची ओळख पटविली. १८७९ मध्ये स्वीडनमधील पी. टी. क्लेव्हे यांनीस्वतंत्र रीत्या ही धातू मिळविली आणि तिला हे नाव सुचविले. स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या होल्मिया या लॅटिन नावावरून हे नाव आले आहे. १९४५ नंतर ही धातूआयन-विनिमयाने आणि तत्पूर्वी भागात्मक स्फटिकीकरणाने वेगळी करण्यात येत होती. निर्जल फ्ल्युओराइडाचे कॅल्शियमानेक्षपण करून ही धातू मिळविता येते. 

 

काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे भाग बनविण्याकरिता होल्मियमाचावापर होतो. त्रिसंयुजी होल्मियमाचे आयन ऑर्थो-पॅरा हायड्रोजन परिवर्तनासाठी उत्प्रेरक म्हणून वापरतात [→ उत्प्रेरण]. होल्मियमाचे ऑक्साइड विशेष उच्चतापसह म्हणून वापरतात. के२ज३ हे ऑक्साइड योग्य अम्लात विरघळविल्यास होल्मियमाचे पिवळ्या-तपकिरी रंगाचे लवण मिळते. 

 

पहा : मूलद्रव्ये विरल मृत्तिका संक्रमणी मूलद्रव्ये. 

साळुंके, प्रिती म.