होफ्ट, गेरार्ड्युस’टी : (५ जुलै १९४६). डच भौतिकीविज्ञ. विश्वाचे घटक असलेल्या उप-आणवीय कणांच्या (मूलकणांच्या) आणि ज्यांच्याद्वारे परस्परक्रिया घडतात अशा मूलभूत प्रेरणांच्या गुणधर्मांचे भाकीत शास्त्रज्ञांना करता येईल अशा गणितीय प्रतिमानांचा विकास केल्याबद्दल होफ्ट आणि मार्टिनस जे. जी. व्हेल्टमन यांना १९९९सालचे भौतिकीचे नोबेल पारि-तोषिक विभागून मिळाले. त्यांच्याया संशोधनकार्यामुळे ‘टॉप क्वार्क’ या नवीन उप-आणवीय कणाचाशोध लागला. [→ मूलकण]. 

 

गेरार्ड्युस’टी होफ्टहोफ्ट यांचा जन्म डेन हेल्डर(नेदर्लंड्स) येथे झाला. १९६४गेरार्ड्युस ‘टी होफ्टमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. नंतर ते महाविद्यालयीन शिक्षणाकरिता उत्रेक्त विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी १९७२ मध्ये भौतिकी विषयाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. ते जिनीव्हा येथील सेर्न संस्थेच्या सैद्धांतिक भौतिकी विभागात फेलो होते (१९७२–७४). ते उत्रेक्त विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक (१९७४–७७) आणि १९७७ पासून सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक आहेत. तसेच ते ड्यूक आणि बॉस्टन विद्यापीठांसह अनेक संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक होते. 

 

होफ्ट हे उत्रेक्त विद्यापीठात व्हेल्टमन यांचे विद्यार्थी होते. त्या वेळी भौतिकीय राशींच्या तपशीलवार गणनाकरिता मूलकण भौतिकीचामूलभूत सिद्धांत (आदर्श प्रतिमान) उपलब्ध नव्हता. १९६० च्या दशकात शास्त्रज्ञांनी विद्युत् दुर्बल सिद्धांत अचूकपणे मांडला. त्या वेळी सैद्धांतिक दृष्ट्या दाखविण्यात आले की, विद्युत् चुंबकीय आणि दुर्बल अणु-केंद्रीय प्रेरणा (परस्परक्रिया) यांची दोन्ही प्रतिमाने एकाच प्रेरणेचेदोन परिणाम आहेत आणि त्याला विद्युत् दुर्बल प्रेरणा ही संज्ञा देण्यात आली. विद्युत् दुर्बल सिद्धांताला गणितीय पाया नव्हता तथापि १९६९ मध्ये होफ्ट आणि व्हेल्टमन यांनी त्यात बदल करून तो यशस्वीपणेवापरता येईल असा तयार केला. १९७१ मध्ये होफ्ट यांनी या सिद्धांतासंबंधी दोन लेख प्रसिद्ध केले. व्हेल्टमन यांनी तयार केलेल्या संगणकाचा वापर करून दोघांनी सिद्धांताची गणितीय सूत्रबद्ध रचना केली. यामुळे पूर्वी भाकीत करण्यात आलेल्या W आणि Z बोसॉन या मध्यस्थ मूलकणांचे गुणधर्म दोघांना ओळखता आले. होफ्ट-व्हेल्टमन प्रतिमानावरून शास्त्रज्ञांना इतर मूलकणांच्या भौतिकीय गुणधर्मांची गणितकृत्ये करता येऊ लागली. उदा., टॉप क्वार्क या मूलकणाच्या द्रव्यमानाचे १९९५ मध्ये प्रत्यक्ष निरीक्षण करता आले. 

 

होफ्ट यांची प्रकाशित झालेली पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत : अंडर द स्पेल ऑफ द गॉज प्रिन्सिपल (१९९४), इन सर्च ऑफ द अल्टिमेट बिल्डिंग ब्लॉक्स (१९९६), प्लेइंग विथ द प्लॅनेट्स (२००८). त्यांचे पुढील विषयांवरील प्रबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत : ‘यंग-मिल्स क्षेत्रांचे पुनर्सामान्यीकरण’, ‘चुंबकीय एकध्रुव’, ‘मापक सिद्धांत’, ‘क्वार्क परिरोध’, ‘पुंजयामिकी’, ‘पुंजगुरुत्व’, ‘कृष्णविवर’ इत्यादी. 

 

होफ्ट हे रॉयल नेदर्लंड्स ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचेसदस्य आहेत. ते अनेक सायन्स ॲकॅडेमींचे परदेशी सदस्य आहेत. त्यामध्ये फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस, अमेरिकन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस तसेच ब्रिटन व आयर्लंड बेस्ड इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स यांचा समावेश आहे.त्यांना नोबेल पारितोषिकाखेरीज वुल्फ पारितोषिक (१९८१), लोरेन्ट्स पदक (१९८६), स्पिनोझा पारितोषिक (१९९५), फ्रँक्लिन पारितोषिक (१९९५), लोमोनोसॉव्ह सुवर्णपदक (२०१०) इ. मानसन्मान मिळाले. त्यांच्या सन्मानार्थ लघुग्रह-९४९१ याला होफ्ट असे नाव देण्यात आले आहे. 

 

गायकवाड, पल्लवी सूर्यवंशी, वि. ल.