हेक : गॅडिडी कुलातील विशेषेकरून मेर्लुसीयस, युरोफायसिस व फायसिस या प्रजातींतील माशांना हेक हे सामान्य नाव दिले आहे. कधीकधी आ. १. तांबडा हेक (युरोफायसिस चुस)मेर्लुसीडी या स्वतंत्र कुलात त्यांचा समावेश केला जातो. कारण त्यांच्या कवटीच्या व बरगड्यांच्या हाडांच्या कंकाल रचनेतफरक आहे. त्यांचा प्रसार समशीतोष्ण सागरात व उष्ण कटिबंधीयपश्चिम आफ्रिकी सागरात आहे. त्यांच्या दोन जाती यूरोपच्या किनाऱ्या-लगत व भूमध्यसामुद्रिक प्रदेशात, एक जाती उत्तर पॅसिफिक महा-सागरात, एक जाती न्यूझीलंडमध्ये व एक जाती दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यालगत तर इतरत्र बऱ्याच जाती उत्तर अमेरिकेच्या अटलांटिक किनाऱ्यालगत आढळतात. 

 

हेक मासे लांबट व मोठ्या डोक्याचे असून त्यांचे दात लांब वतीक्ष्ण असतात. त्यांना दोन पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) असून दुसरा परलांब व त्याच्या मध्यावर एक खाच असते. गुदपक्षही लांब व खाचदार असतो. श्रोणिपक्ष खूपच पुढच्या बाजूस म्हणजे अंसपक्षाच्या पुढीलबाजूस असतात. हे मासे पाण्याच्या तळाशी वावरतात. ते मांसाहारी असून फार खादाड असतात. ते लहान मासे, स्क्विड (लोलिगो) व कवचधारीप्राणी यांवर आपली उपजीविका करतात. शिकार करताना ते पाण्यात थव्याने वावरतात. त्यांचे मांस मऊ असून खाद्यमत्स्य म्हणून त्याला व्यापारी महत्त्व आहे. वसंत ऋतूत ते समुद्रकिनाऱ्याजवळ स्थलांतर करतात आणि हिवाळ्यात खोल समुद्रात परत जातात. मादी नरापेक्षा मोठी असते. मादी उन्हाळ्यात अंडी घालते. अंडी पाण्यावर तरंगतात. या माशाची आयुर्मर्यादा सु. १५ वर्षे असते.

आ. २. रूपेरी हेक (मेर्लुसीयस बायलिनिॲरिस)

 

यूरोपियन व भूमध्यसामुद्रिक हेक (मेर्लुसीयस मेर्लुसीयस) सु. ११० सेंमी लांब असून वजन सु. ३.६ किग्रॅ. असते. रूपेरी हेक (मे. बायलिनि-ॲरिस) ही अमेरिकन अटलांटिक जाती सु. ०.८० सेंमी. लांब व सु. २.३ किग्रॅ. वजनाची असते. स्टॉकफिश (मे. कॅपेन्सिस) ४०–६० सेंमी. लांब असून दक्षिण आफ्रिक्रेच्या किनाऱ्यावर आढळतो.

युरोफायसिस व फायसिस प्रजातींतील हेक मासे नमुनेदार कॉड माशासारखे असून प्रौढांचे शरीर बळकट व रंग तपकिरी करडा असतो. श्रोणिपक्ष लांब व सडपातळ आणि हनुवटीच्या टोकाला लहान स्पृशा (मिशी) असते. हा त्यांच्यातील व मेर्लुसीयस प्रजातीतील फरक होय. त्यांच्या पांढरा हेक (यु. टेन्युइस) व तांबडा हेक (यु. चुस) ह्याआर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या जाती आहेत. पांढऱ्या हेकची लांबी सु. १३५ सेंमी.पर्यंत वाढते व जास्तीत जास्त वजन सु. २२.३ किग्रॅ. असते. मादी नरापेक्षा मोठी असते. त्याचे आयुर्मान १५–२० वर्षे असते. तसेच नावाप्रमाणे त्याचा रंग पांढरा नसून त्याच्या रंगामध्ये विविधता आढळते. त्याच्या पृष्ठीय भागाचा रंग मातकट किंवा जांभळट-तपकिरी आणि दोन्ही बाजू सोनेरी किंवा बिरंजी आणि पोटाकडील भाग पांढरा किंवा पिवळट-पांढरा व त्यावर अनेक काळसर ठिपके असतात. तांबड्या हेकची लांबी सु. ७५ सेंमी. व वजन २-३ किग्रॅ.पर्यंत असते. त्यांचे आयुर्मानसु. १४ वर्षे असते. त्याच्या दोन्ही बाजूचा रंग तांबडा, मातकट किंवा तपकिरी-हिरवा आणि पाठ गडद रंगाची असते. 

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.

 

यूरोपियन हेक (मेर्लुसीयस मेर्लुसीयस) रुपेरी हेक (मेर्लुसीयस बायलिनिॲरिस)