तारंगा : गुजरात राज्याच्या मेहसाणा जिल्ह्यातील एक प्राचीन जैन क्षेत्र. पश्चिम रेल्वेच्या मेहसाणा स्थानकापासून एक लोहमार्गाचा फाटा तारगाहिल स्थानकापर्यंत जातो. तेथून ४·८ किमी. अंतरावरील एका डोंगरावर हे सिद्धक्षेत्र आहे. येथून वरदत्तादी साडेतीन कोटी मुनींना मुक्ती मिळाल्याचे सांगतात. येथे प्राचीन जैन मंदिरे व धर्मशाळा आहेत. दिगंबर आणि श्वेतांबर या पंथाची देवालये व घुमट्या आहेत. डोंगरात सिद्धशिला शिखरावर पार्श्वनाथ, नेमीनाथ या तीर्थंकरांच्या व मुनी सुव्रतनाथ यांच्या मूर्ती आहेत. तारंगा डोंगरावर एक किल्ला आहे.
सावंत, प्र. रा.